agriculture news in marathi, Biometrics now in Gram Panchayats | Agrowon

ग्रामपंचायतींमध्ये आता बायोमेट्रिक
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

सोलापूर : गावात काम करणारे ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक यासारखे कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. याबाबतच्या तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेकडे येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सोलापूर : गावात काम करणारे ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक यासारखे कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. याबाबतच्या तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेकडे येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता.२६) झाली. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते.

ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी यापूर्वी सदस्य उमेश पाटील यांनी केली होती. मात्र, त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. या प्रणालीमुळे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये येऊन हजेरी द्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी कधी होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हजेरीप्रमाणेच वेतन देणे या प्रणालीच्या माध्यमातून शक्‍य होणार आहे.

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...