agriculture news in marathi, biotechnology colleage building inaugration in yavatmal, maharashtra | Agrowon

वातावरणातील बदल हे शेतीसमोरील आव्हान : राज्यपाल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
यवतमाळ : कृषी क्षेत्रासमोर आव्हानांचे अनेक कांगोरे आहेत. त्यामध्ये वातावरणातील बदल हा प्रभावी असल्याने त्या संदर्भातील संशोधनावर भर देण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
 
यवतमाळ : कृषी क्षेत्रासमोर आव्हानांचे अनेक कांगोरे आहेत. त्यामध्ये वातावरणातील बदल हा प्रभावी असल्याने त्या संदर्भातील संशोधनावर भर देण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
 
यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बुधवारी (ता. २०) बोलत होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कुलगुरू डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पालकमंत्री मदन येरावार, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांची या वेळी उपस्थिती होती.  
 
या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की दुष्काळ, समुद्र पातळीत अचानक वाढ, तर कधी पूर परिस्थिती अशी विचित्र स्थिती वातावरणातील बदलामुळे अनुभवली जात आहे. वातावरणातील बदल हे शेती क्षेत्रासमोरील मोठे आव्हान त्यामुळे ठरत आहे. परिणामी वातावरणातील बदलानुरूप तग धरणारे वाण आणि इतर निविष्ठांचे पर्याय उपलब्ध होणे काळाची गरज आहे. त्याकरिता कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.
 
शेती क्षेत्रासमोरील आव्हानांमध्ये सुरवातीला दर्जेदार कृषी निविष्ठा आणि त्यानंतर शेतमालाची विक्री आणि त्याला भाव या आव्हानांचादेखील समावेश आहे; मात्र अशावेळी राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना घेऊन गंभीर असून, अनेक उपाययोजना या क्षेत्राच्या विकासासाठी राबवत आहे, ही नक्‍कीच समाधानाची बाब आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रत्येक थेंबामधून अधिक पीक’ हा नारा दिला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्यासाठीदेखील त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचे आवाहन केले आहे. 

विदर्भात नजीकच्या काळात कीड आणि त्यासोबतच कीडनाशकाच्या माध्यमातून मोठे प्रश्‍न निर्माण झाले. काही शेतकरी, शेतमजुरांना यामुळे जीवही गमवावा लागला. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या समस्यांचे समाधान मिळावे, अशी अपेक्षा या वेळी बोलताना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्‍त केली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...