agriculture news in Marathi, bird exhibition in nandur madhymeshvar sanctuary, Maharashtra | Agrowon

नांदूर मध्यमेश्‍वरला १९पासून पक्षी संमेलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नाशिक : नांदूर मध्यमेश्‍वरमध्ये १९ ते २१ जानेवारीदरम्यान तीन दिवसांचे पक्षी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातून येणाऱ्या फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यांसारख्या देशी-विदेशी पक्ष्यांची माहिती मिळणार आहे. तसेच विविध चर्चासत्र व गाइड बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
 

नाशिक : नांदूर मध्यमेश्‍वरमध्ये १९ ते २१ जानेवारीदरम्यान तीन दिवसांचे पक्षी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात जगभरातून येणाऱ्या फ्लेमिंगो, डक, स्पूनबिल, कॉमन क्रेन यांसारख्या देशी-विदेशी पक्ष्यांची माहिती मिळणार आहे. तसेच विविध चर्चासत्र व गाइड बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दरवर्षी परदेशांतून व विविध राज्यांतून २४२ प्रकारचे पक्षी या अभयारण्यात येतात. काही पक्षी ५० हजार किलोमीटरहून अधिक लांबचा प्रवास करून येथे येतात. त्यांचा प्रवासही येथे उलगडून दाखवला जाणार आहे. नांदूर मध्यमेश्‍वर बंधारा व परिसरात दरवर्षी हिवाळा सुरू होताच परदेशी व स्वदेशी पक्ष्यांचे संमलन भरते.

या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, १९, २० व २१ जानेवारीला सकाळी ६ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. देशभरातील पक्षिप्रेमींना या स्थळांची माहिती व्हावी, यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचा प्रारंभ केला जाणार असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

प्रतिक्रिया
नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पक्षी स्थळांमध्ये व्हावे यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. रामसा ही इराणमधील आंतरराष्ट्रीय संस्था असून, त्यांच्याकडे ही शिफारस केंद्र सरकारने केली आहे. देशभरातील २६ साइट्सला असा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तो या अभयारण्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पक्षी अभयारण्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी याचे आयोजन केले असून, त्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
- एन. आर. प्रवीण, वनरक्षक (वन्यजीव)

इतर अॅग्रो विशेष
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...
वादळी पावसाने पिकांचे नुकसानपुणे : राज्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह...
उष्णतेच्या झळांनी विदर्भ होरपळलापुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट,...
उन्हाळ्यात केळी बागांची जपणूक महत्त्वाचीसद्यस्थितीत तापमानात वाढ सुरू झाली असून तापमान ४०...
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुककोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे...
हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवसमुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे...
अक्षय तृतीयेला आंब्याने खाल्ला भावअक्षय तृतीया व त्यानंतर आंब्याची बाजारपेठ...