नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास प्रारंभ

नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास प्रारंभ
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास प्रारंभ

नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ''बर्ड फेस्ट'' अर्थातच पक्षिमहोत्सवास शुक्रवार(ता. १९)पासून सुरवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे उद्‍घाटन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आले.  उद्‍घाटनप्रसंगी मुख्य वनसंरक्षक एन. के. प्रवीण, सुनील लिमये, एस. व्ही रामाराव, उपवनसंरक्षक रामानुजन, सामाजिक वनीकरणाचे सूर्यवंशी, वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, नांदूरमधमेश्वर अभयारण्याचे अधिकारी भगवान ढाकरे यांची उपस्थिती हाेती. यावेळी आमदार अनिल कदम म्हणाले की, १९८६ मध्ये हा भाग अभयारण्य म्हणून अधिसूचित केला असून, नाशिक वन्यजीव विभागाकडून क्षेत्र व्यवस्थापन करण्यात येते. धरण क्षेत्रात अनेक पक्ष्यांची गर्दी असते, तर विविध प्रकारच्या माशांच्या जातीही येथे पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षणाचा छंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविणे विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी ही मेजवानी असल्याने तीन दिवस या महोत्सवाचे आयोजन केल्याने पर्वणी ठरली आहे.  महाराष्ट्राचे भरतपूर संबोधल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य वन्यजीव विभागाच्या वतीने पहिल्यांदाच तीन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पक्षितज्ज्ञांची व्याख्याने होणार असून, रंगीबेरंगी पक्षी निरीक्षणची संधी पर्यटकांना प्राप्त होणार आहे. पक्ष्यावरील पुस्तके व छायाचित्र प्रदर्शन या निमित्ताने भरविण्यात आले आहे. 

या पक्ष्यांचा मुक्काम अभयारण्यात टिल्स, गडवाल, शॉवलर, क्रे न, पिनटेल आदी स्थलांतरित पक्षी, तसेच पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, मोर शराटी, मोठा रोहित, क्राॅच-कुलंग आदी स्थानिक स्थलांतरित पक्षी, तर पाणकोंबडी, तलवार बदक, तवंग, थापट्या, भुवई, लालसरी, लहान बगळा, जांभळी पाणकोंबडी, मुग्ध बलाक, आयबीस, स्टॉर्क आदी स्थानिक पक्षांबरोबरच या ठिकाणी पक्ष्यांप्रमाणेच उदमांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, रानडुक्कर, मृदू कवच कासवे, विविध प्रकारचे साप तर ऊसक्षेत्र असल्याने बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवासही बघायला मिळतो, तर जलाशयात २४ विविध जातींचे मासे, ४०० पेक्षा अधिक वनस्पती विविधता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com