शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू : मुख्यमंत्री

शिवनेरी गडावर शिवजन्मसोहळ्यात सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवनेरी गडावर शिवजन्मसोहळ्यात सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे. दुष्काळग्रस्त आणि गरजवंत अशा ५० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून, ही प्रक्रिया अजून चालू आहे. शिवछत्रपती राज्य कारभाराच्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

शिवनेरी किल्ल्यावर (ता. जुन्नर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळा मंगळवारी (ता.१९) पार पडला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जातिधर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्या प्रेरणेनेच राज्य सरकार विविध प्रश्न मार्गी लावत आहेत.''

मुख्यमंत्री म्हणाले,''मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरित गुन्हे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.''

''छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वांत महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देऊ शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तर शिवाजी महाराज यांचे गड किल्ले संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आत्तापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. याच धर्तीवर राज्यातील इतर महत्त्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सुरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, '' असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिवजन्मस्थळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी काही वेळ पालखी खांद्यावर घेतली. महिला पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेजीम पथकाच्यावतीने पारंपरिक खेळांचे सादरीकरण केले. उत्सवाला राज्याच्या कानाकाोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांनी गड फुलून गेला होता.

सोहळ्याचे क्षणचित्रे...

दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार जुन्नर तालुक्यातील दाऱ्या  घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल,  असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओझर येथे केले. हायब्रीड अॅ न्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा प्रारंभ येथे करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले , आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. अष्टविनायक हे आपले वैभव आहे. भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील,असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com