agriculture news in marathi, Birth Anniversary of JijauSaheb Celebrated in country | Agrowon

राष्ट्रमाता जिजाऊ यांना लाखोंनी केले अभिवादन
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा (प्रतिनिधी) ः राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी राज्यासह देशभरातून आलेल्या जिजाऊभक्तांनी फुलून गेली होती.

राष्ट्रमातेला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येतील जनसमुदायाने सिंदखेडराजा नगरीतील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात हजेरी लावली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडून राष्ट्रमाता जिजाऊ यांना राजवाड्यातील जन्मस्थळी अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार घालून पूजा केली.

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा (प्रतिनिधी) ः राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी राज्यासह देशभरातून आलेल्या जिजाऊभक्तांनी फुलून गेली होती.

राष्ट्रमातेला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येतील जनसमुदायाने सिंदखेडराजा नगरीतील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात हजेरी लावली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडून राष्ट्रमाता जिजाऊ यांना राजवाड्यातील जन्मस्थळी अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार घालून पूजा केली.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार तोताराम कायंदे, नगराध्यक्ष ॲड. नाझेर काझी, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे, विनोद वाघ आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

विविध मान्यवरांकडून अभिवादन
राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथे अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार राहुल बोंद्रे, जयश्रीताई शेळके, शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी राजवाडा परिसरात अभिवादन केले. 

जिजाऊसृष्टीवर दिवसभर उत्सव
राजवाडा परिसरात अभिवादनासाठी एकीकडे जिजाऊभक्त दाखल होत असताना दुसरीकडे जिजाऊसृष्टीवर दिवसभर हजारोंची उपस्थिती होती. या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघासह इतर संघटनांच्या पुढाकाराने सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी मुख्य सोहळ्याला सुरवात झाली. मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...