agriculture news in marathi, BJP on backfoot in UP, Bihar loksabha bypolls | Agrowon

पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव
वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

लखनौ/पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील तीन लोकसभा पोटनिवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बुधवारी (ता.१४) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. केंद्रात आणि उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही सत्तेत असलेल्या भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईशान्येकडील राज्यांतील विजयाचा आनंद या मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीतील अपयशाने हिरावून घेतला गेला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने केलेल्या युतीचा दणका भाजपला बसला.

लखनौ/पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील तीन लोकसभा पोटनिवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बुधवारी (ता.१४) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. केंद्रात आणि उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही सत्तेत असलेल्या भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईशान्येकडील राज्यांतील विजयाचा आनंद या मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीतील अपयशाने हिरावून घेतला गेला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने केलेल्या युतीचा दणका भाजपला बसला.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या तीन, तर विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, 'यूपी'त समाजवादी पक्ष, तर बिहारमध्ये लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विजयी पताका फडकावली. भाजपला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले.

मागील १९ वर्षांपासून अभेद्य असलेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरच्या गडाला सुरूंग लावण्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला यश आले आहे. येथे "सप'चे उमेदवार प्रवीण निषाद यांनी २१ हजार ८८१ मतांनी भाजपच्या उपेंद्र पटेल यांना पराभूत केले. तर, फूलपूरमध्येही "सप'चे उमेदवार नागेंद्र पटेल हे विजयी झाले असून, त्यांनी भाजपच्या कौशलेंद्र पटेल यांचा ५९ हजार ६१३ मतांनी पराभव केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या या दोन जागांसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली  होती.

दरम्यान, बिहारमध्ये अररिया येथे लोकसभेसाठी, तर जेहानाबादमध्ये विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलास मोठे यश मिळाले, तर भभुआ विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आले आहे. मुस्लिमबहुल अररियामध्ये सरफराज आलम हे विजयी झाले आहेत. तस्लिमुद्दीन यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. सरफराज यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांना ४५ हजार मतांनी पराभूत केले. जेहानाबाद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत "राजद'चे उमेदवार कृष्ण मोहन विजयी झाले असून, त्यांनी अभिराम शर्मा यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला. यामुळे येथून त्यांचेच पूत्र कृष्णमोहन यांना उमेदवारी देण्यात आली होती. भभुआत विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते दिवंगत आनंदभूषण पांडे यांच्या पत्नी रिंकी पांडे या विजयी झाल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...