‘सेमीफायनल’मध्ये भाजपला झटका

निवडणुक निकाल
निवडणुक निकाल

नवी दिल्ली ः लोकसभेची दिशा ठरविणाऱ्या आणि अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवीत ‘सेमीफायनल’ जिंकली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काॅंग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. तर मध्य प्रदेशात बहुमतासाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात चढाओढ सुरु आहे.  भाजपची मंडळी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपच येणार असल्याचा दावा केला जात होता, पण तसे काही झाले नाही.  कॉंग्रेसला राजस्थान आणि मध्य प्रदेशात जे यश मिळाले त्याचे श्रेय राहुल गांधी यांना द्यावे लागणार आहे. यामधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल ब्रिगेडमधील जे सचिन पायलट, ज्योतिरादित्त शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्यांना राजस्थान, मध्य प्रदेशच्या मैदानात उतरविले. गेल्या वेळी राजस्थानात सत्ता गेल्यानंतर राहुल गांधी यांनी सचिन पायलटांना प्रदेशाध्यक्ष केले तर दुसरीकडे ज्योतिरादित्ताना मध्य प्रदेशात बसविले आणि कमलनाथांसारखा अनुभवी नेता जोडीला दिला. दोन्ही राज्यांत लढय्या तरुण नेत्यांनी गेल्या चार वर्षांत भाजपच्या नाकात दम आणला.  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रतिमेला धक्का बसला होता. शेतकऱ्यांवरील गोळीबार, व्यापम गैरव्यवहार तसे ऍन्टीइन्कूबन्सीचाही फटका बसला आहे. तरीही ज्योतिरादित्यांनी सातत्याने चौहान यांच्यावर चौफेर टोलेबाजी केली. येथे भाजप येणारच हा जो दावा केला जात होता तो खोटा ठरला. आज तेथे भाजप जरी सत्तेवर आली तरी भाजपचा नैतिक पराभव झाला आहे.  राजस्थानात ज्या पद्धतीने कॉंग्रेसवाले दावा करीत होते तसे झाले नाही. येथेही भाजपशी टक्कर देताना पक्षाला प्रयत्न करावे लागले आहेत. तरीही सचिन पायलटांमुळे कॉंग्रेसने भाजपच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षाही अधिक यश खेचून आणले आहे. एकून पाच राज्यांच्या निकाल पाहता जर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जर भाजप विजयी झाला असता तर पुढची आठनऊ महिने भाजप देशभर सेमीफायनलचा जल्लोष केला असता. काही झाले तरी मतदारांनी भाजपला या निवडणुकीने इशारा दिला आहे.  राहुल गांधी यांची बाजी आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांमध्येच खरा सामना रंगणार आहे. या निवडणुकीकडे पाहता प्रादेशिक किंवा छोट्या पक्षांनाही महत्त्व राहणार आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे चढाओढ सुरू आहे. तेथे अपक्षांना किंवा मायावतींना महत्त्व प्राप्त झाले आहे. काही असले तरी राहुल गांधींनी बाजी मारली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com