ताज्या घडामोडी
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा पक्षपातळीवर बिगुल फुंकला आहे. आगामी निवडणुकीत 2014 पेक्षाही मोठे यश मिळविण्याचा निर्धार राज्याराज्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१५) व्यक्त केला. दिल्लीतील बैठकीत "मेरी सरकार अच्छी सरकार' व "फिर एक बार मोदी सरकार' या घोषणांचा उद्घोष झाला. नमो ऍपचा वापर जास्तीत जास्त करा, असे उपस्थितांना बजावण्यात आले. "भाजप विजयामागून विजय मिळवत असला, तरी आत्मगौरवाचे रूपांतर आत्मसंतुष्टीत होऊ न देता पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष द्यावे,' असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय व राज्यांचे सारे पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष, कार्यालयप्रमुख, संघटनमंत्री यांची ही बैठक दिवसभर झाली. नंतर बहुतांश नेत्यांनी फोन स्वीच ऑफ करून टाकले. तीन टप्प्यांत झालेल्या या बैठकीचे उद्घाटन व समारोप करताना शहा यांनी यंदा होणाऱ्या तीन राज्यांच्या व नंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजपच्या राज्य शाखांच्या कामांचा व प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज भाजप कार्यालय या योजनेचा आढावा घेण्यात आला. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या पूर्ततेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रत्येकाने सूचना द्याव्यात असा दंडक घालून देण्यात आला होता. 20 हजार गावांत, विशेषतः त्या गावांतील दलितांच्या घरी मुक्कामी रहाणे हे उद्दिष्ट किती मंत्र्यांनी, नेत्यांनी पूर्ण केले, याचाही सविस्तर आढावा घेतला गेला.
---
तीन मोठे कार्यक्रम
आगामी महिनाभरात भाजप तीन मोठे कार्यक्रम घेणार आहे, त्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ते असे ः 17 मे- भाजपच्या सर्व आघाड्यांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणारी बैठक, 26 मे- मोदी सरकारची चौथी वर्षपूर्ती, जूनमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी ते जागतिक योग दिन या दरम्यान होणारे उपक्रम.
---
भाजप विरुद्ध झाडून सारे, अशी जी धडपड सुरू आहे, त्यातच भाजपच्या आगामी यशाची बीजे दडली आहेत.
- अमित शहा, भाजपचे अध्यक्ष
- 1 of 347
- ››