'कोरेगाव भीमासारखे प्रकार घडू शकतात'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरेगाव भीमा घटना हिंसाचारामुळे पक्षापासून दूर चाललेल्या दलित समाजाला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. मंगळवारी (ता.१६) झालेल्या भाजप प्रदेश विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरगाव हे मोठे षडयंत्र असल्याचे सांगत येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, असा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंग्या झेंड्या खाली सर्वांना सोबत आणावं. भाजप आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी वर लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून निवडणुकीच्या तयारीला लागावे. दरम्यान विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला २६ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून उत्तर दिले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

निवडणुकांच्या तयारीला लागा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, असे आवाहनही फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. गेल्या काही महिन्यांपासून २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपचे पगारी विस्तारक बूथ पद्धतीने पक्षाची बांधणी करत आहेत. हे काम आता पूर्ण होत आले असल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com