agriculture news in Marathi, BJP gave fraud data for hide failure, Maharashtra | Agrowon

अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी आकडेवारी : अशोक चव्हाण
विजय गायकवाड
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

भाजपकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपने अमरावती जिल्ह्यात १५० ग्रामपंचायतींत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपने फक्त ३६ तर काँग्रेस पक्षाने १४० ग्रामपंचायतींत विजय मिळविला आहे.
अशोक चव्हाण, खासदार

 

मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता. १७) जाहीर झाले. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरूच आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

खासदार चव्हाण म्हणाले, की निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या १०६३ आणि दुसरा टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाचं पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. भाजपकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपने अमरावती जिल्ह्यात १५० ग्रामपंचायतींत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपने फक्त ३६ तर काँग्रेस पक्षाने १४० ग्रामपंचायतींत विजय मिळविला आहे.

‘‘आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ पैकी २७, अमरावती जिल्ह्यात २४९ पैकी १४०, सांगली जिल्ह्यातील ४५२ पैकी १३९, पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी ७७ ग्रामपंचायतींत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरू आहे,’’ असा टोला खासदार चव्हाण यांनी लगावला.  
 

इतर ताज्या घडामोडी
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...