agriculture news in marathi, BJP government against reservation : Dhananjay Munde | Agrowon

भाजपा सरकार आरक्षण विरोधी : धनंजय मुंडे
वृत्तसेवा
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर : सरकारला मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर, लिंगायत या कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे गुरुवारी (ता.१४) केला. 

नागपूर : सरकारला मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर, लिंगायत या कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट झाले आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे गुरुवारी (ता.१४) केला. 

विधानपरिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सरकारच्या असमाधानकारक उत्तरानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मुंडे पत्रकारांशी बोलत होते. श्री. मुंडे म्हणाले, की ज्या उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणातील शैक्षणिक आरक्षण ग्राहय धरले होते, त्या उच्च न्यायालयामध्ये नोकरीच्या संदर्भात आरक्षण रहायला पाहिजे याच्यासाठी कॉन्टीफिशियल डाटा या सरकारने द्यायचा होता तो जाणीवपूर्वक दिला नाही, म्हणून या आरक्षणाच्या बाबतीत उच्च न्यायालयाकडून वेगळा निर्णय झाला. पण  २१ डिसेंबर २०१४ ला ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा कायदा याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने आणला. त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षांनी एकत्रित मुस्लिम आरक्षणाचासुध्दा कायदा या सभागृहामध्ये आणावा अशी मागणी केली, पण त्यावेळेस आम्ही धर्माच्या आधारावरील आरक्षण नाकारतो असे सरकार म्हणाले. पण उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, हे धर्माचे  आरक्षण नाही तर या समाजात जे आर्थिकदृष्टया दुर्बल आहेत त्यांना हे पाच टक्क्यांचे आरक्षण आहे.  उच्च न्यायालयाने मान्य केलेले शैक्षणिक आरक्षण दिले नाही यासाठी आम्ही सरकारचा निषेध करत सभात्यागही केला.

यावेळी संजय दत्त, आमदार हेमंत टकले, आमदार शरद रणपिसे, आमदार बाबाजानी दुराणी, आमदार ख्याजा बेग, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडीत उपस्थित होते.

राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा : मुंडे
राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संबंधी आज आमदार कपील पाटील यांनी मूळ उपस्थित केलेल्या मुद्दयावर दोन वेळा गोंधळ होऊन सभागृह कामकाज बंद पडले.  श्री. मुंडे म्हणाले, की सरकारचे शिक्षणासंदर्भातील किती दुटप्पी आणि उदासिन धोरण आहे हे लक्षात आले. राज्यातील १३०० च्यावर शाळा बंद करण्याचा डाव शिक्षणमंत्र्यांनी चालू केला आहे. विनाअनुदानित शाळांचे अनुदान सुरु करण्याबाबतीत हे सरकार सकारात्मक नाही. मग प्राथमिक शिक्षण असो,माध्यमिक असो किंवा कनिष्ठ महाविदयालय असो एकंदरीतच सर्व महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचे पूर्ण वाटोळे झालेले आहे. आणि याला राज्याचे शिक्षणमंत्री जबाबदार आहेत.

यासंदर्भात उत्तर देताना कोणतेही ठोस उत्तर मंत्र्यांना देता आले नाही आणि जे उत्तर दिले तेसुध्दा सत्तेच्या मस्तीमध्ये दिले आणि म्हणून विधानपरिषदेमध्ये शिक्षणासंदर्भात सरकारच्याविरोधात बहिष्कार आम्ही टाकला असे मुंडे म्हणाले. शिक्षणाच्या प्रश्नावर दोनवेळा सभागृह बंद झाले अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिक्षणविभागाच्या प्रश्नावर मुंडे,  कपिल पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आ. हेमंत टकले,  विधानपरिषदेमध्ये सरकारला धारेवर धरले. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...