agriculture news in marathi, BJP has Incoming row in party : CM | Agrowon

भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे स्वागत : मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या निरंजन डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग असून, त्यासाठी थोडा वेळ वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत असलेल्या निरंजन डावखरे यांचे पक्षात स्वागत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग असून, त्यासाठी थोडा वेळ वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी (ता. २३) ''राष्ट्रवादी''ला धक्‍का दिला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी ''राष्ट्रवादी''च्या आमदारकीचा राजीनामा देत भापजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. गुरुवारी (ता. २४) त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की भाजपमध्ये निरंजन डावखरे यांचे स्वागत आहे. निरंजन यांच्या सहभागाने भाजपला मोठा फायदा होणार आहे. डावखरेंच्या तीन पिढ्या राजकारणात सक्रिय आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी डावखरे यांना उमेदवारी देण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करण्यात येईल. भाजपच्या संपर्कात आणखी अनेक नेते असून, रांगेत उभे आहेत. त्यासाठी आणखी थोडा वेळ वाट बघा.

निरंजन डावखरे म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून मी हे पाऊल उचलले आहे. पदवीधर आणि शिक्षकांसाठी काम करता येईल. शरद पवार मोठे नेते आहेत, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे.

निरंजन तुला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही : अजित पवार
‘‘राष्ट्रवादीत असताना पहिला युवक आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी दिली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले; पण आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,’ अशी अगतिकता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार निरंजन डावखरे यांना निरोप देताना व्यक्‍त केली. विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी "राष्ट्रवादी''ला धक्‍का दिला.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...