भाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर !

भाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर !
भाजप नेत्यानेच पाच एकरातील पिकावर फिरवला नांगर !

नांदेड : एकीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने राज्यासह देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव तालुक्यातील भाजपाचे नेते तथा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतात घेतलेल्या वांग्याचे भाव कवडीमोल झाल्याने आपल्या शेतातील पाच एकर वरील वांगे ट्रॅक्टर लावून उखडून टाकले.

शेतमालाला भाव मिळत नाही. भाजप सरकारने सत्तेत दिलेल्या आश्वासनांना बगल दिली असल्याने देशभरातील शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही. अशातच, मुळ शेतकरी असलेले माजी खासदार तथा भाजप नेते सुभाष वानखेडे यांनी पाच एकरात वांगे पिकाची लागवड केली होती. मात्र, हजारो रुपये खर्च करुन ही वांग्याला बाजारात प्रति किलो तीन ते पाच रूपये भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या वानखेडे यांनी शेतात ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला. पाच एकर वरील वांगे ट्रॅक्टर फिरवला... video

शेतातील लावलेले वांग्याचे पिकं ट्रॅक्टर लावून अक्षरशः उखडून टाकले आणि शेतमालाला, भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली. वानखेडे यांनी पाच एकरातील वांग्याचे पिक काढून भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com