agriculture news in Marathi, bjp performance in grampanchayat in sangali district, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेक
गणेश कोरे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

सांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखेर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा घसरता आलेख या निवडणुकीत सावरला आहे. जिल्ह्यातील सव्वाचारशेपैकी सुमारे साठ टक्‍क्‍यांहून अधिक ग्रामपंचायतीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच भाजपचे वारे गल्लीबोळात शिरले आणि त्याचा प्रभावही दिसला.

सांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपच्या चौखेर उधलेल्या वारुला ग्रामपंचायत निवडणुकीत ब्रेक लागला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा घसरता आलेख या निवडणुकीत सावरला आहे. जिल्ह्यातील सव्वाचारशेपैकी सुमारे साठ टक्‍क्‍यांहून अधिक ग्रामपंचायतीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीने बाजी मारली आहे, मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच भाजपचे वारे गल्लीबोळात शिरले आणि त्याचा प्रभावही दिसला.

जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पैकी २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. प्रत्येक तालुक्‍यात संमिश्र गट तयार झाले होते. यामुळे आपला उमेदावर कसा निवडणूक येईल सर्वांनी याची तयारी केली होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पलूस व कडेगाव तालुक्‍यात कॉंग्रेसने चांगली कामगिरी करत भाजपला रोखले. तेथे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख गटाची ताकद कमी पडल्याचे दिसले.

वाळवा तालुक्‍यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडल्याने माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला ६ ग्रामपंचायती मिळाल्या. शिराळ्यात राष्ट्रवादीने झेंडा रोवला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यात राष्ट्रवादीचा गड पुन्हा एकदा उभा राहिला.

जत तालुक्‍यात विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या समर्थकांवर कॉंग्रेसने कुरघोडी करत ३३ ग्रामपंचायतींत सत्ता मिळवली. भाजपला १६ तर राष्ट्रवादीला २ ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचे आकडे आहेत. खानापूर तालुक्‍यात शिवसेनेचा गावा गावात प्रभाव दिसून आला. आमदार अनिल बाबर यांच्या मुळे खानापूर तालुक्‍यात भगवे वादळ तयार केले.

मिरज तालुक्‍यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. तेथे भाजप तीन गटांत विखुरला असला तरी कॉंग्रेसला फारसे यश आलेले नाही. तासगाव तालुक्‍यात खासदार संजय पाटील समर्थक भाजपने चांगली कामगिरी करत दिवंगत आर. आर. पाटील गटाला तगडी लढत दिली आहे. तासगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...