agriculture news in marathi, bjp, shiv sena Step towards for alliance, mumbai, maharashtra | Agrowon

भाजप-शिवसेनेचे युतीच्या दिशेने पाऊल
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

मुंबई  : एकमेकांना इशारे आणि धमक्या देण्याचे राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे सत्र सुरू असल्याने युती होणार की नाही, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची मोट पुन्हा जुळत असल्याचे दिसते आहे. नुकतीच या दोन्ही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकल्याचे समजते. 

मुंबई  : एकमेकांना इशारे आणि धमक्या देण्याचे राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे सत्र सुरू असल्याने युती होणार की नाही, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची मोट पुन्हा जुळत असल्याचे दिसते आहे. नुकतीच या दोन्ही पक्षांच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकल्याचे समजते. 

सध्याच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार, भाजप आणि शिवसेना २०१४ ला जिंकलेल्या आपापल्या जागांवर पुन्हा लढणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ आणि शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. त्याच जागा दोन्ही पक्ष लढवतील, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात असून, उरलेल्या ७ जागांबाबत तोडगा काढला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांच्या पवित्र्यानंतर भाजप आणि शिवसेना यांची युती होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर टीका केल्याने युतीची शक्यता संपुष्टात आल्याचा समज होता. परंतु त्याच वेळी पडद्याआडून युतीसाठी हालचालीही सुरू होत्या. नव्या जागावाटप सूत्राबाबत भाजप किंवा शिवसेना यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

मात्र पक्षातील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वेळेचाच फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.  गेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेने काही जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या. त्यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपचा हात सोडून आता महाआघाडीत गेली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पराभूत झालेल्या जागांबाबत तसेच मित्रपक्षांसाठी सोडलेल्या जागांबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेशी युती व्हावी, यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेणार असल्याचे समजते. लोकसभेसाठी शिवसेनेची साथ अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. म्हणून शिवसेनेशी युती करण्यासाठी पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर युतीसाठी पक्षातूनच दबाव येत आहे. अनेक खासदारांना स्वतंत्रपणे भाजपशी लढणे किती अवघड आहे, याची कल्पना आहे. त्यांनीही युतीसाठी आग्रह धरला आहे. तसेच ज्यांना निवडणूक लढवायची नाही असे राज्यसभेतील शिवसेना खासदार युतीमध्ये खो घालत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती अपरिहार्य आहे, ही युती गेली खड्ड्यात, असे ठाकरे कितीही म्हणत असले तरीही त्यांनाही युतीची गरज आहे, हे माहिती आहे. युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...