भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासून
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासून

भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासून

नवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची म्हणजेच देशभरातील समस्त पदाधिकाऱ्यांची परिषद येत्या ११ व १२ जानेवारी २०१९ला येथे होणार आहे.  याच दरम्यान भाजपच्या मागासवर्गीय, शेतकरी, महिला, युवा आघाड्यांच्या बैठकाही आयोजित करून पक्षनेतृत्व २०१९ च्या लढाईची रूपरेषा निश्‍चित करेल. मागासवर्गीय आघाडीची बैठक नागपूरमध्ये होणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही व त्यांच्या निकालांवरही चर्चा झाली नाही. कारण या बैठकांच्या कार्यक्रम पत्रिकेतच तो विषय नव्हता, असा दावा पक्षाचे सरचिटणीस व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला. मिशन २०१९साठी भाजप नेतृवाने आगामी दोन महिन्यांत देशभरात बैठकांचा धडाका उडवून देण्याचे ठरविले आहे. भाजप पदाधिकारी व प्रदेशाध्यक्षांची राष्ट्रीय बैठक आज दुपारी दीनदयाळ मार्गावरील मुख्यालयात सुरू झाली. त्या दरम्यान पक्षाचे सरचिटणीस व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पत्रकारांना सांगितले, की राष्ट्रीय परिषद व कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक जानेवारीत आयोजित करण्यात  आली आहे.  मागासवर्गीय आघाडीची बैठक नागपूरमध्ये १९ व २० जानेवारीला होणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा त्यासाठी मुख्य वक्ते असतील. त्यानंतर दोन व तीन फेब्रुवारीला अनुसूचीत जाती-जमाती आघाडीची बैठक भुवनेश्‍वरमध्ये, तर ओबीसी आघाडीची बैठक पाटण्यात १५ व १६ फेब्रुवारीला होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com