वऱ्हाडात उडदाचे मोठे नुकसान
गोपाल हागे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017
मी या हंगामात पाच एकरांत उडीद लागवड केली होती. अाता या पाच एकरांत केवळ दोन क्विंटल उडीद झाला. कापणीसाठी एकरी १५०० रुपये, तर मळणीसाठी ६०० रुपये प्रतिपोते द्यावे लागले. पेरणी, तणनाशक, खत, फवारणी हा वेगळा खर्च लागलेला अाहे. रब्बीत कुठल्या भरोशावर पेरणी करावी हा प्रश्न पडला अाहे.
- गजानन भालतिलक, बोर्डी, ता. अकोट जि. अकोला
अकोला : पेरणीनंतर पावसाने मारलेली दडी अाणि पीक काढणीला अाल्यानंतर अालेल्या पावसामुळे वऱ्हाडात या हंगामात उडदाचे मोठे नुकसान झाले अाहे. अनेक शेतकऱ्यांना लागवड खर्चसुद्धा निघण्याची शक्यता दिसत नाही.
 
सध्या उडीद काढणीचा हंगाम सुरू झालेला अाहे. उडदाची सोंगणी सुरू अाहे. सोंगणीसाठी १३०० ते १५०० रुपये एकर मजुरी घेतली जात अाहे. त्यानंतर मळणीसाठी थ्रेशरचालकांकडून ५०० ते ६०० रुपये दर अाकारण्यात येत अाहे. बहुतांश शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटलचीही उत्पादकता मिळालेली नाही.
 
वास्तविक या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनचे क्षेत्र कमी करून उडदाच्या लागवडीकडे कल होता. चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा होती. परंतु अाता हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे समोर येऊ लागले अाहे. या हंगामात जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. उडदाचे पीक चांगल्याप्रकारे उगवलेही होते. दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम झाला. प्रामुख्याने फूल धारणेच्या काळात पिकाला ताण बसला. त्यामुळे शेंगांची संख्या कमी झाली. ज्या शेंगा परिपक्व झाल्या त्यापासून खर्च निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
 
परंतु नेमका गणेशोत्सवाच्या काळात पाऊस झाला. या वेळी उडदाची बऱ्याच प्रमाणात सोंगणी झालेली होती. हा उडीद अोला झाल्याने त्यावर बुरशी आली. काही शेतात जागेवरच कोंब फुटले तर काही  शेतांमधील उडदाचा रंग बदलला. यामुळे अाता व्यापारीसुद्धा खरेदी करताना दर पाडून घेतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत अाहेत. 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...