agriculture news in Marathi, Blairo Maggi says, Ban on glyphosate would be 'disaster' for Brazil agriculture, Maharashtra | Agrowon

ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल ः ब्लेरो मॅग्गी
वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सध्या देशात मॉन्सॅन्टोच्या ग्लायफोसेटच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. जे शेतकरी मान्यता रद्द असेलेले ग्लायफोसेट वापरतील त्यांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा वापर थांबवावा.
- फ्रेड्रीगो फॅवॅचो, कृषी व्यवसाय वकील, ब्राझील

पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने ग्लायफोसेटच्या वापरामुळे कॅन्सर होतो, हे मान्य केल्यानंतर येथील न्यायालयानेही ग्लायफोसेटच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र ग्लायफोसेटवर बंदी घातल्यास ब्राझीलच्या कृषी क्षेत्रावर संकट ओढावेल, असे ब्राझीलचे कृषिमंत्री ब्लेरो मॅग्गी यांनी म्हटले आहे.

ब्राझीलच्या न्यायालयाने तीन आॅगस्ट रोजी देशात येथून पुढे ग्लायफोसेटचा घटक असलेल्या उत्पादनाची नोंदणीच होणार नाही आणि जे अशा प्रकारचे उत्पादन सध्या वापरात आहेत, त्यांची मान्यता सप्टेंबरपासून रद्द करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग जोपर्यंत यावर सुरक्षा उपाय काढत नाही तोपर्यंत ग्लायफोसेटवरील बंदी कायम राहील, असे आदेश दिले आहेत.

याविषयी बोलताना कृषिमंत्री मॅग्गी म्हणाले, की ब्राझीलमध्ये तणनियंत्रणासाठी ९५ टक्के ग्लायफोसेटचा वापर केला जातो. सोयाबीन, मका आणि कापूस पिकातील तण नियंत्रणासाठी सरसकट ग्लायफोसेटचा वापर केला जातो. सध्या ग्लायफोसेटला कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही. ब्राझील हा जगातील महत्त्वाचा सोयाबीन आणि मका निर्यातदार देश आहे. ग्लायफोसेटच्या वापरमुळे तण नियंत्रण सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. याला सध्या पर्यात काय आहे?

ब्राझीलच्या महाधिवक्ता कार्यालयाने म्हटले आहे, की यासंबंधी कृषी विभागाच्या पाठिंब्यासह ही केस पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. ‘‘न्यायालयात सरकारचा दावा मान्य करून ग्लायफोसेटवरील बंदी मागे घेण्यात येईल,’’ असा विश्वास मॅग्गी यांनी व्यक्त केला.

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...