'वैद्यनाथ'च्या रसाच्या टाकीचा स्फोट; १२ कामगार जखमी

'वैद्यनाथ'च्या रसाच्या टाकीचा स्फोट; १२ कामगार जखमी
'वैद्यनाथ'च्या रसाच्या टाकीचा स्फोट; १२ कामगार जखमी

परळी, जि.बीड : परिसरातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील ऊसाच्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन १२ कामगार जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारी घडली.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. यंदा गेल्या महिन्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरु झाला. दरम्यान, आज दुपारी ऊसाच्या रसाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. गरम रसामुळे वाफ साचल्याने स्फोट झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये १२ कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com