agriculture news in Marathi, bogus BT Brigel in India, Maharashtra | Agrowon

अवैध बीटी वांग्याचा देशात शिरकाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

२००९-१० मध्ये जीईएसी ने बीटी वांग्यास तपासणीअंती सुरक्षित घोषित केले होते. परंतु, तत्कालीन केंद्र सरकार पातळीवर त्यावर राजकीय निर्णय झाला. आता मागील सहा वर्षांपासून बांगलादेशात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तेथील शेतकरी तसेच ग्राहकांना याबाबत काही अडचणी नाहीत. तंत्रज्ञान हे पाण्यासारखे वाहत असते. उपयुक्त तंत्रज्ञान शेतकरी कुठूनही आणि कसेही स्वीकारतो. भारत सरकारने पुन्हा एकदा बीटी वांग्याच्या बाबतीत सखोल अभ्यास करून याबाबत निर्णय घ्यायला हवा. 
- डॉ. सी. डी. मायी, अध्यक्ष, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (SABC), नवी दिल्ली

नवी दिल्ली ः हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या शेतात बीटी वांग्याची लागवड आढळून आली आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेतील तपासणीत या शेतकऱ्याच्या शेतातील वांगी पिकामध्ये कीड नियंत्रणासाठी जनुकीय अभियांत्रिकी प्रक्रियेद्वारा ‘जीवाणू-प्रथिन’ घातले असल्याचे सिद्ध झाले आहे. जीएम-फ्री इंडिया संघटनच्या कार्यकर्त्यांनी ही बाब जनुकीय अभियांत्रिकी संमती समिती (जीईएसी) तसेच हरियाना सरकारच्या निदर्शनास आणून दिली. 

खाद्य पिकांमध्ये जीएम वाणांना देशात परवानगी नाही. अशा वेळी हरियानातील जीएम वांग्याची लागवड अवैध ठरते. पर्यावरण संरक्षण कायद्याचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. हरियाना सरकारने याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन जीएम-फ्री इंडिया संघटनेला दिले आहे. जीईएसीने २००९ मध्ये महिको या कंपनीने निर्माण केलेल्या बीटी वांग्याच्या प्रायोगिक लागवडीस मान्यता दिली होती. परंतु, तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी २०१० मध्ये बीटी वांग्याच्या व्यावसायिक लागवडीचा निर्णय स्थगित ठेवला होता. बीटी वांग्याचा या देशातील जैवविविधता आणि मानवी आरोग्य यावर स्वतंत्रपणे अधिक अभ्यास व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सुचविले होते. 

बांगलादेशात बीटी वांग्याच्या लागवडीस परवानगी आहे. हरियाना राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बीटी वांग्याचा प्लॉट आहे त्यांनी मध्यस्थांच्या मार्फत रोपं खरेदी केली आहेत. त्यामुळे हरियाना-पंजाब या राज्यात बीटी वांग्याचे बियाणे-रोपे पुरविणारी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याची शक्यताही जीएम-फ्री इंडियाच्या एका कार्यकर्त्यानी वर्तविली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...