agriculture news in Marathi, bogus fertilizer provided to farmers producers companies with the help of contractors in Dhule districts, Maharashtra | Agrowon

ठेकेदारांच्या मदतीने शेतकरी कंपन्यांना बोगस खतपुरवठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट खते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. 

पुणे : ठेकेदारांशी संगनमत करून निकृष्ट खते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. 

धुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना बोगस खताचा पुरवठा झाला असून, त्यात कृषी खात्यातील काही अधिकारी गुंतल्याचा स्पष्ट आरोप या कंपन्यांनी केला आहे. विशेष म्हणजे कृषी खात्याने या खताचे नमुने काढून प्रयोगशाळेत तपासले असते चाचण्यांमध्ये नमुने अप्रमाणित निघाले आहेत. नाशिकमधील खतनियंत्रण प्रयोगशाळेत धुळे जिल्ह्यातील खत निरीक्षकांनी नमुने पाठविले होते. प्रयोगशाळेने विविध तीन अहवालांमध्ये  फेरस आयर्न, झिंक आणि मॉलिब्डेनम अशी तीन मूलद्रव्ये प्रमाणात आढळलेले नसल्याचे नमूद केले आहे. कृषी खात्याच्या शिफारशीवरून झालेल्या या बोगस खताच्या पुरवठ्याची जबाबदारी कोण घेणार आहे, असा सवाल या कंपन्यांनी केला आहे.  

धुळे जिल्ह्यातील जीवनधारा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने कृषी खात्याशी पत्रव्यवहार करून ही फसवणूक निदर्शनास आणून दिली आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून धुळे जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांना यवतमाळमधून निविष्ठांचा पुरवठा करण्यात आला आहे. कृषी खात्याने त्यासाठी निविदा मागवून १४ लाख रुपये किमतीचा माल वाटला. शेतकरी कंपन्यांनी या निविदा वाटल्यानंतर शेतकऱ्यांनी गुणवत्ता व वजन अशा दोन्ही मुद्द्यांवर कंपन्यांकडे तक्रारी केल्या आहेत, असे या कंपनीने नमूद केले आहे. 

निविष्ठा उत्पादक कंपनीच्या ठेकेदाराने ''जीवनधारा''ला पत्र पाठवून निविष्ठा पुरवठा केल्याबद्दल एक लाख १३ हजार रुपयांचे बिल चुकते करण्याची मागणी केल्यामुळे हा घोटाळा उघड झाला आहे. मुळात जीवनधाराने कोणत्याही निविष्ठांची मागणी केलेली नसताना पुरवठा झाल्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद चक्रावून गेले आहेत. 

यवतमाळमधील साई अॅग्रोटेक कंपनीने एकाच पत्त्यावर दोन कंपन्या दाखवून कृषी खात्याकडून ऑर्डर पदरात पाडून घेतली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी निविदा मागवून ऑर्डर दिलेली नसताना १६ लाख रुपयांच्या निविष्ठा पुरविण्यात आल्या आहेत. त्यात पुन्हा या निविष्ठा बोगस असल्यामुळे या कंपन्यांविरुद्ध आणि कृषी खात्यातील भ्रष्ट कंपूविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणीदेखील जीवनधारा शेतकरी उत्पादक कंपनीने केली आहे.

इतर बातम्या
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषणलातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...