agriculture news in Marathi, bogus pesticide stock catch in parbhani, Maharashtra | Agrowon

बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा साठा परभणीजवळ जप्त
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (पीजीआर), वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करून पॅंकिंवर विविध कंपन्यांचे लेबल लावून विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा तसेच कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २८ लाख ७६ हजार ९१० रुपये किमतीची रसायने, विविध कंपन्यांचे लेबल्स तसचे अन्य साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला.

परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (पीजीआर), वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करून पॅंकिंवर विविध कंपन्यांचे लेबल लावून विक्री करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखा तसेच कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २८ लाख ७६ हजार ९१० रुपये किमतीची रसायने, विविध कंपन्यांचे लेबल्स तसचे अन्य साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला.

शनिवारी (ता.२१) या प्रकरणी दोन जणांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. परभणी शहरातील खानापूर -पिंगळी रस्त्यावरील बलसा या गावात गेल्या वर्षभरापासून विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके, वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी (ता. २०) दुपारी चारच्या सुमारास याठिकाणावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला.

छाप्यात राज्यातील विविध ठिकाणच्या कंपन्यांच्या नावाचे लेबल लावलेल्या पीकवाढ संवर्धके तसेच वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा साठा, रसायने, लेबल्स सह अन्य साहित्य आढळून आले. 

शनिवारी (ता. २१) सकाळी पाच वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत कीटनाशके, रसायने, लेबल एकूण २८ लाख ७६ हजार ९१० रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात फौजदार एस. ए. गोपीनवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माधव केंद्रे (रा. वाघदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) आणि गीता सुर्यवंशी (रा. भाग्यनगर, परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पीकवाढ संवर्धके तसेच कीटकनाशकांचे नमुने काढण्यात आले असून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे उपविभागीय अधिकारी सागर खटकाळे यांनी सांगितले.

 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...