agriculture news in marathi, Bogus students in 30 schools in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील ३० शाळांत बोगस विद्यार्थी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

जळगाव : शाळेत पटावरील नावात बोगस विद्यार्थ्यांची नावे आणि संख्या दाखविण्याचा प्रकार शाळांच्या मुख्याध्यापकांना भोवणार आहे. जिल्ह्यातील अशा ३० शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाने दिले आहेत.

जळगाव : शाळेत पटावरील नावात बोगस विद्यार्थ्यांची नावे आणि संख्या दाखविण्याचा प्रकार शाळांच्या मुख्याध्यापकांना भोवणार आहे. जिल्ह्यातील अशा ३० शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक कार्यालयाने दिले आहेत.

या ३० शाळांमध्ये जिल्हा परिषद व पालिकांच्या २०, तर १० खासगी शाळा आहेत. या शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे पत्र शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांच्या सहीने नुकतेच येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे.

शाळांमधील विद्यार्थी संख्या, त्यांना मिळणारा शासकीय योजनांचा लाभ, याबाबत शासनाने पटपडताळणी मोहीम राबविली होती. राज्यभरात एक हजार ४०४ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळले. त्यात जळगाव जिल्ह्यातील ३० शाळा आहेत. यासंदर्भात न्यायलयाने संबंधित शाळांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, कारवाई न झाल्याने २०१४ मध्ये अवमान याचिका दाखल झाली होती. यानंतर संबंधित शाळांवर फौजदारी कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानुसार शिक्षण संचालकांनी कारवाईचे पत्र दिले आहे. त्यात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्याविरोधात कारवाईचे निर्देश आहेत.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणात संबंधित शाळांकडून खुलासे मागविले आहेत. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे ते खुलासे प्राप्त होत असून त्याबाबत त्यांच्याकडून एकत्रित अहवाल मागविण्यात आला आहे. त्यावर शिक्षणाधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी यांची बैठक बोलावून अहवाल घेतला जाईल. त्यात प्राथमिक चर्चा केली जाईल, असे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितल्याची माहिती आहे.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...