agriculture news marathi, boll-worm attack on BT in Telhara Tahsil, Maharashtra | Agrowon

तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळी
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

दोन प्लॉटसना आम्ही भेटी दिल्या. साधारण २२ मे च्या सुमारास लागवड असलेली बीटी कपाशी सध्या फुलांच्या अवस्थेत दिसली. या फुलांवर गुलाबी बोंड अळी दिसून अाली आहे. अळीचा प्रादुर्भाव दोन ते तीन टक्के अाहे. शेतकऱ्यांना उपाययोजना सांगण्यात येत अाहेत.
- डॉ. जी. के. लांडे, साहायक प्राध्यापक,  कीटकशास्त्र विभाग,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा

अकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड झालेली कपाशी फूल-पाती अवस्थेत अाली असून, त्यावर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली अाहे. त्यातच तेल्हारा तालुक्यात काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे. कृषी यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून त्या भागात सर्वेक्षण, उपाययोजना तसेच जनजागृतीला लागली अाहे. तेल्हारा तालुक्यातील थार, कोठा या गावांत प्रादुर्भावाला सुरवात झाल्याचे समोर अाले अाहे. 
 

गेल्या हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावाला तेल्हारा तालुक्यातूनच सुरवात झाली होती. या भागातून सर्वांत अाधी तक्रारी झाल्या होत्या. याही वर्षात बोंड अळीबाबत तेल्हारा तालुक्यातून पुन्हा एकदा सुरवात झाल्याचे समोर अाले अाहे. 
कोठा येथील कैलास अहेरकर यांनी दोन एकरांत २१ मे रोजी कपाशीची लागवड केलेली अाहे. तर याच तालुक्यातील थार येथील राजू फोकमारे यांनी साडे पाच एकरात बीटी कपाशीची लागवड केलली असून, या दोघांच्याही शेतातील पिकावर गुलाबी अळी दिसून अाली. कपाशीला फुले, पात्या धरलेल्या असून त्यावर हा प्रादुर्भाव अाढळल्याने शेतकरी धास्तावले अाहे.

 रखरखत्या उन्हापासून तसेच वन्य प्राण्यांपासून संरक्षण करीत शेतकऱ्यांनी कपाशी वाढवली. कपाशीच्या झाडांवर फुले, पात्या लागल्या अाहेत. दोन दिवसांपूर्वी या शेतातील कपाशीवर गुलाबी अळी पाती, फुलावर दिसून अाली. ही बोंड अळीच अाहे काय याबाबत शेतकऱ्यांना शंका अाल्याने त्यांनी कृषी विभागाला कळविले. ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अशोक कंडारकर व तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱी प्रादुर्भावग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. दोन दिवसांपासून या भागात पाहणी केली जात अाहे.     

बोंड अळी प्रादुर्भाव झाल्याचा प्रकार चर्चेत अाल्यानंतर शनिवारी (ता. २१) उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे साहायक प्राध्यापक डॉ. जी. के. लांडे, डॉ. बाविस्कर व अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दहिगाव, थार येथे दोन शेतांना भेटी दिल्या.    

निर्बंध असूनही बियाणे मिळालेच    
बियाणे कंपन्यांना अावाहन करीत कृषी विभागाकडून कुणीही २० मे पर्यंत बियाणे बाजारात पाठवू नये असे निर्देश देण्यात अाले होते. काही कंपन्यांनी हे अादेश मानत २० मे नंतर पुरवठा सुरू केला. परंतु एवढे सारे निर्बंध असतानाही काही बीटी कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात अाले. त्यामुळेच शेतकऱ्यांनी २० मे नंतर लगेचच मॉन्सून पूर्व कपाशीची लागवड केल्याची चर्चा होऊ लागली अाहे. शेतकऱ्यांना कोणत्या कंपनीने व कसे बियाणे पुरविले हे अाम्हाला शोधावे लागेल, असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया 
बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या हंगामात २० मे पर्यंत बियाणे उपलब्ध करून दिले नव्हते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी २३ मे नंतर बियाणे उपलब्ध करून घेत प्री-मॉन्सून लागवड केली अशा तेल्हारा तालुक्यात थार, कोठा या गावांमध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळी दिसून अाली आहे. अाम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे. अाम्ही या भागात तातडीने ग्रामसभा घेऊन त्यामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देणार अाहोत. 
-अशोक कंडारकर, उपविभागीय कृषी अधिकारी, अकोट        

तेल्हारा तालुक्यात बोंड अळी अाल्याची माहिती मिळाली अाहे. अामच्या यंत्रणा तातडीने त्या भागात दाखल झाल्या असून, मार्गदर्शन करीत अाहेत. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना सांगितल्या जात आहेत.
-राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला   

मी २२ मे रोजी कपाशीचा बीटी वाण लावला अाहे. त्याच्या प्रत्येक झाडावरील फुलांमध्ये अळीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे. 
- कैलास अहेरकर, कापूस उत्पादक शेतकरी

इतर अॅग्रो विशेष
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...