agriculture news in Marathi, boll worm attack on everywhere in state, Maharashtra | Agrowon

बोंड अळी सर्वत्रच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे: शेतकऱ्यांना लवकर बियाणे न विकण्याची कंपन्यांना तंबी, कोट्यवधी रुपयांचा प्रसारप्रचारावर खर्च करूनही यंदादेखील गुलाबी बोंड अळीचे राज्यभर आक्रमण झालेले आहे. बोंड अळीच्या संभाव्य नुकसानीचा अंदाज अजून तरी काढता येणार नाही, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

कपाशीच्या पिकांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली असलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, गेल्या हंगामाइतका प्रादुर्भाव अद्याप नसला तरी पुढे या गावांच्या संख्येत किती वाढ होईल याचा अंदाज आम्हाला आलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पुणे: शेतकऱ्यांना लवकर बियाणे न विकण्याची कंपन्यांना तंबी, कोट्यवधी रुपयांचा प्रसारप्रचारावर खर्च करूनही यंदादेखील गुलाबी बोंड अळीचे राज्यभर आक्रमण झालेले आहे. बोंड अळीच्या संभाव्य नुकसानीचा अंदाज अजून तरी काढता येणार नाही, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

कपाशीच्या पिकांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली असलेल्या गावांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, गेल्या हंगामाइतका प्रादुर्भाव अद्याप नसला तरी पुढे या गावांच्या संख्येत किती वाढ होईल याचा अंदाज आम्हाला आलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

गुलाबी बोंड अळी नियंत्रणाकरिता कृषी विभाग सर्व पातळ्यांवर धडपड करतो आहे. त्यामुळेच आतापर्यंत सव्वाचार लाख सापळे लावले गेले आहेत. मात्र, प्रयत्न करूनही काही गावांमध्ये आर्थिक नुकसान पातळीच्यावर बोंड अळी पसरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

फवारणीद्वारे बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचे कीटकनाशक वाटली जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दीड हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. बोंड अळीमुळे यंदा निश्चित किती नुकसान होईल, याचा अंदाज कृषी खात्याला आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बोंड अळीसाठी सुरवातीपासून उपाययोजना केलेल्या आहेत. कापूस उत्पादक पट्ट्यातील ग्रामपंचायतींना बोंड अळी नियंत्रण मोहिमेत सहभागी करून घ्या, तसेच गावागावात फिरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला आणि दिलासा द्या, अशा सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. 

गुलाबी बोंड अळीने गेल्या हंगामात ३४ लाख ३५ हजार हेक्टरवरील कपाशीचा फडशा पाडला होता. त्यामुळे १३ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. यंदा काही भागात गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीची उत्पादकता घटू शकते. मात्र, पुढील दोन महिन्यानंतर उत्पादकेतेविषयी चित्र स्पष्ट होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चालू हंगामात शेतकऱ्यांनी ४० लाख हेक्टरच्या आसपास कपाशीचा पेरा केला आहे. बोंड अळी तसेच बोगस बियाणे यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे. 

क्रॉपसॅपच्या माध्यमातून आम्ही गुलाबी बोंड अळीचे सर्वेक्षण राज्यभर हाती घेतले आहे. सामूहिक नियंत्रणासाठी सध्या २० जिल्ह्यांमध्ये चार लाख २० हजार सापळे देण्यात आलेले  आहेत. सापळ्यातील ल्युअर्स मुदतीत न बदल्यात या सापळ्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे आम्ही आम्ही साडेबारा लाख ल्युअर्स पुरविले आहेत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

अनेक जिल्ह्यांत प्रादुर्भाव
बोंड अळीने आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात दोन, नगर जिल्ह्यात ३० , सोलापूर एक, औरंगाबाद जिल्ह्यात १५, बीड १६, जालना दोन, हिंगोली ८, हिंगोली ९, लातूर २, उस्मानाबाद ३, परभणी ४५, नांदेड २५, अकोला १३, अमरावती ३, बुलडाणा ३८, वाशीम ७, यवतमाळ २२, नागपूर १०, चंद्रपूर ५, तर वर्धा जिल्ह्यात एकूण १२ गावांमधील कपाशीच्या क्षेत्रात आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली आहे.  

यंदाही कंपन्यांच्याविरोधात कारवाईची शक्यता
बोंड अळीमुळे यंदा शेतकऱ्यांचे जादा नुकसान झालेच तर संबंधित कापूस उत्पादक कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र कापूस बी-बियाणे कायदा २००९ मधील तरतुदीप्रमाणे कारवाई होण्याची शक्यता यंदाही आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी पंचनामेदेखील करावे लागतील. याबाबत अंतिम चित्र मात्र दिवाळीनंतरच स्पष्ट होईल, असे एका विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...