agriculture news in marathi, boll worm attack in parbhani, Maharashtra | Agrowon

परभणीत बोंडअळीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

परभणी : जिल्ह्यामध्ये मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या बी.टी. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

परभणी : जिल्ह्यामध्ये मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या बी.टी. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

परभणी, सेलू, पूर्णा तालुक्यांसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांनी लागवड केलेले कपाशीचे पीक आता पाते, फुले लागलेल्या अवस्थेत आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून या कपाशीमध्ये डोम कळ्या आढळून आल्या आहेत. मांडाखळी (ता. परभणी) येथील महादेव राऊत यांच्या शेतावर मंगळवारी (ता. २४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर, डॉ. कृष्णा अंभुरे, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषी अधिकारी के. एम. जाधव, कृषी सहयक कृष्णा रेंगे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.

राऊत यांच्या बी. टी. कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावाची सुरवात झाल्याचे आढळून आले. ‘‘सद्यस्थितीत बोंड अळीचा प्रादुर्भाव हा अल्प प्रमाणात असून त्यासाठी शेतक­ऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सुरवातीस किडीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे नर-मादी मिलनात अडथळा आणता येईल.

पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. अळीग्रस्त कळ्या वा फुले अळीसकट नष्ट कराव्यात. निंबोळी अर्काची किंवा शिफारसीत कीटकनाशकांची फवारणी करावी,’’ असे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. अनंत बडगुजर यांनी सांगितले.सात जून रोजी अडीच एकरवर कपाशीची लागवड केली आहे. रेफ्यूजी बियाणे त्यामध्ये मिसळून देण्यात आलेले होते. गेल्या तीन, चार दिवसात पिकाचे निरीक्षण केले असता आठ-दहा फुलांमध्ये अळ्या आढळून आल्या, असे शेतकरी महादेव राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, सेलू तसेच पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगितले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...