agriculture news in marathi, boll worm attack in Yavatmal, Maharashtra | Agrowon

यवतमाळमध्ये कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

यवतमाळ ः जिल्ह्यात गेल्यावर्षी मोठ्या क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोंड अळी दिसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शिवराज महादेव ढोले यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. 

गेल्यावर्षीच्या हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या अळीच्या नियंत्रणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली. शिफारशीत नसतानादेखील काही कीटकनाशक फवारण्यात आली. त्यानंतरदेखील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण शक्‍य झाले नाही.

यवतमाळ ः जिल्ह्यात गेल्यावर्षी मोठ्या क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर्षी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोंड अळी दिसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) येथील शिवराज महादेव ढोले यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. 

गेल्यावर्षीच्या हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या अळीच्या नियंत्रणासाठी पुढाकार घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली. शिफारशीत नसतानादेखील काही कीटकनाशक फवारण्यात आली. त्यानंतरदेखील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण शक्‍य झाले नाही.

याउलट अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावे लागले. तब्बल २२ जणांचे मृत्यू बोंड अळीच्या नियंत्रणादरम्यान फवारणी करताना झाले होते. यावर्षी कृषी विभागाकडून जागृती करण्यात येत असली तरी हंगामाच्या सुरवातीलाच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या काही भागांत कपाशीचे पीक फुलावर आहे. फुलावर असलेल्या या पिकात अनेक ठिकाणी गुलाबी बोंड अळी दिसून आली. 

कापसाचे हब पांढरकवडा
आंधप्रदेशच्या सीमेवर असलेल्या पांढरकवडा तालुक्‍यात कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. खैरगाव देशमुख येथील शिवराज ढोले यांनी ६ जूनला लागवड केली. १८ एकरावर त्यांचा कापूस आहे. यातील फुलधारणा झालेल्या कापसावर गुलाबी बोंड अळी त्यांना निरीक्षण करताना दिसून आली. हंगामाच्या सुरवातीलाच बोंड अळी दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कृषी विभाग अनभिज्ञ
पांढरकवडा तालुक्‍यातील गावांमध्ये बोंड अळी दिसून आल्यानंतरदेखील कृषी विभाग किंवा कृषी विद्यापीठाकडून या गावात जात, प्रादुर्भाव वाढू नये याकरिता जागृती तर दूरच साधी माहिती घेण्यासाठीदेखील कोणी भेट दिली नसल्याचे शिवराज ढोले यांनी सांगितले. त्यावरूनच संबंधित विभागाची उदासिनता दिसून येत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...