agriculture news in marathi, bollworm affect Panchnama Stopped in marathwada | Agrowon

बोंड अळीच्या पंचनाम्याचं घोडं अडलेलंच
संतोष मुंढे
गुरुवार, 18 जानेवारी 2018

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख हेक्‍टरवरील गुलाबी बोंड अळी बाधित क्षेत्राचा पंचनामा अहवाल प्राप्त न झाल्याने मराठवाड्यातील नुकसानीचा अंतिम अहवालचं घोडं अजूनही अडलेलंच आहे. त्यामुळे अंदाजीत मदत किती लागेल हे कळविले असले तरी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल शासन स्तरावर पोचेल तेव्हाच अपेक्षित मदतीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख हेक्‍टरवरील गुलाबी बोंड अळी बाधित क्षेत्राचा पंचनामा अहवाल प्राप्त न झाल्याने मराठवाड्यातील नुकसानीचा अंतिम अहवालचं घोडं अजूनही अडलेलंच आहे. त्यामुळे अंदाजीत मदत किती लागेल हे कळविले असले तरी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल शासन स्तरावर पोचेल तेव्हाच अपेक्षित मदतीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

मराठवाड्यासह विदर्भातील कपाशी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने जवळपास नेस्तोनाबुतच केली. एकीकडे शेतकऱ्यांकडून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीविरोधात तक्रारीचा ओघ सुरू असतानाच शासनाने सर्व विभागीय आयुक्‍तांसह जिल्हाधिकाऱ्यांना अधिनस्त यंत्रणेला संयुक्‍त पंचनामे करण्याचे व त्याचा अहवाल दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. उपलब्ध यंत्रणेच्या भरवशावर दहा दिवसांत पंचनाम्याचे अहवाल सादर होणे शक्‍यच नव्हते. परंतु बराच कालावधी लोटूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचा प्रश्न कायम आहे.

कृषिमंत्र्यांनी सातबारावर उल्लेख असेल व शेतात पीक नसेल तर पंचनाम्यावर तसा उल्लेख करून त्यानुसार मदत मिळेल असे जाहीर केले. प्रत्यक्षात पेरे अद्यावत नसतील, किंवा पेरे दुसरेच असतील तर अशा प्रकरणांचा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत यंदा १६ लाख ५५ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी २३ लाखांवर शेतकऱ्यांच्या १६ लाख २७ हजार हेक्‍टरवरील पिकाला बोंड अळीने फटका बसला.

चालू आठवड्यापर्यंत बाधित झालेल्या एकूण क्षेत्रापैकी साडेबावीस लाखांवर शेतकऱ्यांच्या १४ लाख ७३ हजार हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. तर जवळपास दीड लाख हेक्‍टरवरील नुकसान झालेल्या कपाशीच्या क्षेत्राचे पंचनामे बाकी आहेत. यामध्ये औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख हेक्‍टर व हिंगोली जिल्ह्यातील जवळपास २६ हजार हेक्‍टरवरील पंचनामे बाकी असलेल्या क्षेत्राचा समावेश आहे. एकीकडे संयुक्‍त पंचनामे दुसरीकडे तक्रारीचे पंचनामे या दोन्ही पंचनाम्यांमुळे, कपाशीचे क्षेत्र जास्त असलेल्या या जिल्ह्यांमधील पंचनामे बाकी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अंतिम आकडेवारीवर मदत अवलंबून

पंचनाम्यांच्या अंतिम आकडेवारीवर मदतीचं गणित अवलंबून आहे. परंतु, मराठवाड्यातील बाधित क्षेत्रानुसार प्रती हेक्‍टरी किमान ६८०० रुपये मदतीनुसार लागणारी मदत नेमकी किती असू शकते, याविषयीचा अंदाज शासनाला कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

इतर बातम्या
उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढवाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये...
वनामकृविचे कुलगुरू मराठी भाषिक असावेतपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा...शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी...
सिंचन विहिरी, फळबागांचा निधी थेट बँक...मुंबई: मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना सिंचन...
देशात खरीप पेरणीला प्रारंभनवी दिल्ली ः देशात खरीप हंगाम २०१८-१९ च्या...
‘डिमोशन’ रोखण्यासाठी अनेकांची पळापळ;...अकोला ः राज्याच्या कुठल्याही विभागात नसेल असा...
परभणी जिल्ह्यात कृषी अवजारे बँकेस...सगरोळी, जि. नांदेड : सगरोळी (ता. बिलोली)...
मराठवाड्यात आठ लाख ७५ हजार टन रासायनिक...औरंगाबाद: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत रासायनिक...
पाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६...पुणे  ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील...
मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत ७.७९...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ७४६ लघुप्रकल्पांत...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने राबविली अर्ज...यवतमाळ : खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानापोटी नगरला...नगर ः कपाशीवर झालेल्या बोंड अळी प्रार्दुभावाच्या...
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर,...पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची...
कृषी विभागातील समुपदेशन बदल्या स्थगित;...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने...
सूत उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानीजळगाव : कापूस गाठींच्या उत्पादनाप्रमाणे सुताच्या...
नगर जिल्ह्यात ४२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर :  जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता...
शेतीतील नव तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा...अकोला :  भारतीय शेतकरी जागतिक बाजारात...
कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा...पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग...
बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावर वाटप...पुणे : महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन...
अहंकारातूनच माजी खासदाराने जनतेवर...भंडारा : पालघरमध्ये खासदारांचे निधन झाले...