बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला

बोंड अळी नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला
बोंड अळी नुकसानग्रस्तांना मदतीसाठी अध्यादेश निघाला

पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी झाली आहे. काेरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६ हजार ८००, तर बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. तर, धानासाठी देखील याच पद्धतीने मदत देण्यात येणार आहे.  या दाेन्ही पिकांची मदत मिळण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार असून, यासाठी सातबारा उताऱ्यावर कापूस पिकाची नाेंद असणे आवश्‍यक असणार आहे. तसेच, २०१७-१८ मध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये निविष्ठा अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. त्या क्षेत्रामध्ये मदतीची द्विरुक्ती हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com