agriculture news in marathi, bollworm affected revenue centers droped in khandesh | Agrowon

बोंड अळीच्या नुकसानीतून अनेक महसूल मंडळे वगळली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 मार्च 2018

जळगाव : गुलाबी बोंड अळीने कापसाचे ९० टक्के नुकसान झाल्याचे दावे करणाऱ्या खानदेशातील कृषी यंत्रणांची धरसोड वृत्ती आणि पंचनाम्यांचे किचकट निकष यांमुळे अनेक कापूस उत्पादक नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एकही गाव किंवा मंडळ मदतीसाठी पात्र नाही. तर जळगाव व धुळे जिल्ह्यातील १२१ महसूल मंडळांपैकी फक्त २६ महसूल मंडळे मदतीसाठी पात्र असल्याची बाब कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आली आहे.

जळगाव : गुलाबी बोंड अळीने कापसाचे ९० टक्के नुकसान झाल्याचे दावे करणाऱ्या खानदेशातील कृषी यंत्रणांची धरसोड वृत्ती आणि पंचनाम्यांचे किचकट निकष यांमुळे अनेक कापूस उत्पादक नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील एकही गाव किंवा मंडळ मदतीसाठी पात्र नाही. तर जळगाव व धुळे जिल्ह्यातील १२१ महसूल मंडळांपैकी फक्त २६ महसूल मंडळे मदतीसाठी पात्र असल्याची बाब कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आली आहे.

शासनाचा भरपाईचा निधी वाचावा आणि कृषी विभागाचा कामाचा ताण कमी व्हावा म्हणूनच टेबलावर बसून पंचनामे उरकले आणि मंडळनिहाय पंचनामे भराभर कागदावर रंगवून त्याचे अहवाल सादर झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. खानदेशात धुळे व नंदुरबारचे क्षेत्र, शेतकरी व नुकसानीस पात्र शेतकरी यांचे आकडे समोर आले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती हे मात्र अजून समोर आले नाही.

मंडळनिहाय पंचनामे केले. तसेच मागील पाच वर्षांमधील कापसाची लागवड, उत्पादन यासंबंधीची सरासरी काढण्यात आली. पीक कापणी अहवालांची पडताळणी केली. यात अनेक मंडळांमध्ये गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान दिसलेच नाही. अशातूनच नंदुरबार जिल्ह्यात एकही गाव गुलाबी बोंड अळीने बाधित नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एक लाख २० हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. या जिल्ह्यात २९ महसूल मंडळे आहेत. या पैकी एकाही मंडळात गुलाबी बोंड अळीने ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झालेले नाही. धुळे जिल्ह्यात दोन लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. या जिल्ह्यात ३५ महसूल मंडळे आहे. परंतु दोनच मंडळांमध्ये कापसाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. एकूण ८६ महसूल मंडळे जिल्ह्यात आहेत. पैकी फक्त २४ मंडळांमध्ये नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

खानदेशचे प्रमुख पीक कापूस आहे. कापसाचे ९० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र तर जानेवारीतच रिकामे झाले. कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी एक क्विंटलही आले नाही. असे असतानाही अगदी मोजकेच शेतकरी गुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंबंधी पात्र असल्याचे अहवालातून समोर येत असल्याने पंचनामे व त्याचे निकष यासंबंधीचा मोठा घोळ शासकीय यंत्रणांनी केला आहे, हे स्पष्ट झाल्याचे शेतकरी, जाणकारांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया...
कापसाचे पंचनामे टेबलावर बसून उरकले. शासनाला शेतकऱ्यांना मदतच द्यायची नाही. हे सर्वांना माहीत होते. त्यातूनच किचकट निकष पंचनाम्यासंबंधी तयार केले. मंडळ, पीक कापणी अहवाल याचा काय संबंध आहे. नुकसान झाल्याचे जगाला दिसत आहे. यंत्रणांना कामाचा ताण नको आहे. कापूस उत्पादक कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन तर बागायतीला एकरी तीन क्विंटलपर्यंतही आले नाही. कापसाचे पीक काढून फेकावे लागले. असे असताना दोन चार टक्के नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांनाच भरपाई कशी मिळेल, अशी व्यवस्था यंत्रणा व शासन यांनी केलेली दिसते.
- कडूअप्पा पाटील, शेतकरी संघटना 

इतर बातम्या
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
टेंभूच्या पाण्यातून दहा बंधारे भरून द्यासोलापूर : टेंभू-म्हैसाळ योजनेतून सांगोला...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
'सिद्धेश्वर यात्रेची कामे समन्वयाने करा'सोलापूर : सिध्देश्वर यात्रा सुरळीतपणे पार...
उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट...देवळा, जि. नाशिक : देवळा तालुक्यात मोठ्या...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
सीताफळ विकासाकडे कृषी सचिवांचे वेधले...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
दुष्काळी स्थितीत प्राधान्याने उपाययोजना...परभणीः परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे...
येणेचवंडी प्रकल्पाला गळतीगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : येणेचवंडी (ता....
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...