agriculture news in marathi, bollworm compansation stuck in criteria, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये बोंड अळीची नुकसानभरपाई ‘निकषा`च्या कचाट्यात
सूर्यकांत नेटके
रविवार, 4 मार्च 2018
नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा यंदाचे उत्पादन कमी असले तरच शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरतील अशी अट आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पंचनामे करून ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल असला तरी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाचे सरासरी उत्पादन जास्त आहे. त्यामुळे कापसाचे बोंड अळीने मोठे नुकसान झाले असले तरी निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
 
नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा यंदाचे उत्पादन कमी असले तरच शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरतील अशी अट आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पंचनामे करून ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल असला तरी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाचे सरासरी उत्पादन जास्त आहे. त्यामुळे कापसाचे बोंड अळीने मोठे नुकसान झाले असले तरी निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
 
नगरसह राज्यातील बहुतांश भागात अशीच स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी साठ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. मात्र, अलीकडच्या काळात लागवड क्षेत्रात वाढ होत सरासरी क्षेत्र एक लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. यंदा एक लाख पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले, तरी नंतरच्या काळात पावसाने दिलेला ताण आणि सरतेशेवटी झालेला जोराचा पाऊस यामुळे नुकसान झाले. त्यात पुन्हा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे साधारण ६० ते ७० टक्के नुकसान झाले.
 
जिल्हा प्रशासनाने बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. प्रशासनाच्या अहवालानुसार १३८६ गावांतील एक लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांच्या एक लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टर क्षेत्रावरील कापसाचे बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी साधारण १५७ कोटी २३ लाख १४ हजार रुपयांची गरज आहे. मात्र सरकारची पाच वर्षांची अट राज्यातील कापूस उत्पादकांसाठी अडचणीची ठरत आहे.
 
बोंड अळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना २०१२ ते २०१६ या पाच वर्षांतील कापसाच्या उत्पादनाची सरासरी काढली जात आहे. ती सरासरी यंदाच्या उत्पादनापेक्षा जास्त असली तरच नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकरी पात्र होणार आहेत. जिल्ह्यामधील ९७ महसूल मंडळापैकी ६२ मंडळात कापसाचे पीक घेतले आहे. मात्र पाच वर्षांच्या सरासरी उत्पादन निकषानुसार कोपरगावमधील पाच व जामखेडमधील दोन अशा अवघ्या सात महसूल मंडळातच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
मागील पाच वर्षांची उत्पादनाची सरासरी काढताना त्यातील २०१२, २०१४ व २०१५ या तीन वर्षी दुष्काळ होता. त्या वर्षी हेक्‍टरी दोन िंक्वंटल उत्पादन निघाले होते असा कृषी विभागाचा अहवाल आहे. त्यामुळे या निकषानुसार नुकसानभरपाई दिली गेली तर जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. पाच वर्षांपैकी तीन वर्ष दुष्काळ होता असे कृषी विभागानेही वरिष्ठांना कळवले आहे. 
 
बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) : नगर ः ३४४५, पारनेर ः १५७, पाथर्डी ः ३६१३१, संगमनेर ः १०३५.५४ , कोपरगाव ः ४६४९.१४, राहाता ः९२९.७४, श्रीरामपूर ः ४३२१.२०, नेवासे ः २१९०६, राहुरी ः १०२२२, शेवगाव ः ४७१९२, कर्जत ः ६३३६, श्रीगोंदे ः २८०६.३२, जामखेड ः ३६०२.४१. 
 
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...