agriculture news in marathi, bolworm hit cotton productivity,marathwada, maharashtra | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत कपाशी उत्पादकतेला फटका
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
नांदेड : गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कपाशीच्या उत्पादकतेला फटका बसला आहे. यंदा नांदेड जिल्ह्यात कपाशीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ५.३६ परभणी जिल्ह्याची १०.२१, हिंगोली जिल्ह्याची उत्पादकता ८.९६ क्विंटल आल्याचे पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे.
 
नांदेड जिल्ह्यात तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ८.९२, परभणी जिल्ह्यात १४.९०, हिंगोली जिल्ह्यात ६.४५ क्विंटल आल्याचे आढळून आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परभणी जिल्ह्यात तुरीच्या उत्पादकतेत २.२१ क्विंटलने वाढ झाली आहे. कपाशीच्या उत्पादकतेत ३.१६ क्विंटलने घट झाली आहे.
 
२०१७-१८ च्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात कपाशीची २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टरवर लागवड झाली होती. सर्व १६ तालुक्यांतील ५८८ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून कपाशीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ५.३६ क्विंटल तर रुईचा उतारा १.८७ क्विंटल आल्याचे आढळून आले आहे. अर्धापूर तालुक्यात कपाशीची उत्पादकता सर्वाधिक १३.४९ क्विंटल तर देगलूर तालुक्यात सर्वांत कमी २.२४ क्विंटल आली आहे.
 
जिल्ह्यात ६३ हजार ४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. सर्व १६ तालुक्यांतील २७६ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून जिल्ह्याची तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी ८.९२ क्विंटल आली आहे. धर्माबाद तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक प्रतिहेक्टरी १४.०५ क्विंटल आली, तर किनवट तालुक्याची उत्पादकता सर्वांत कमी प्रतिहेक्टरी ४.९४ किलो आली आहे.
 
परभणी जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. सर्व नऊ तालुक्यांतील ३१० पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून कपाशीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी १०.२१ क्विंटल तर रुईचा उतारा ३.५७ क्विंटल आला आहे. पूर्णा तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक १५ क्विंटल तर पाथरी तालुक्याची सर्वांत कमी ६.७९ क्विंटल आल्याचे आढळून आले आहे.
 
परभणी जिल्ह्यात ४७ हजार ५९५ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील १४४ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी सरासरी १४.९० क्विंटल आली असल्याचे आढळून आले आहे. परभणी तालुक्यात उत्पादकता सर्वाधिक २०.३२ क्विंटल तर पाथरी तालुक्यात सर्वांत कमी ८.३१ क्विंटल आल्याचे आढळून आले आहे.
 
गतवर्षी ५२ हजार ७५३ हेक्टरवर तुरीची लागवड झाली असताना हेक्टरी उत्पादकता १२.६९ क्विंटल आली होती. कपाशीची १ लाख ६७ हजार ६०४ हेक्टरवर लागवड झाली असताना प्रतिहेक्टरी उत्पादकता १३.३७ क्विंटल आली होती.
 
हिंगोली जिल्ह्यात कपाशीची ४१ हजार ५३५ हेक्टरवर लागवड झाली होती. सर्व पाच तालुक्यांतील २६४ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरुन कपाशीची उत्पादकता हेक्टरी सरासरी ८.९६ क्विंटल तर रुईचा उतारा हेक्टरी ३.१३ क्विंटल आला असल्याचे आढळून आले आहे.
 
तुरीची ५४ हजार ६०५ हेक्टरवर लागवड झाली होती. पाच तालुक्यांतील ९६ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरुन तुरीची उत्पादकता हेक्टरी सरासरी ६.४५ क्विंटल आल्याचे आढळून आले आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...