agriculture news in marathi, Bond ali on Kapashi in Vidharbha | Agrowon

विदर्भात कपाशीवर बोंड अळी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

अकोला : विदर्भात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती व व्यवस्थापनाची मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने कृषी आयुक्तांना पाठवला आहे. संबंधित यंत्रणांना उपाययोजना करण्याबाबत कळविण्याचे त्यात म्हटले आहे.

अकोला : विदर्भात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती व व्यवस्थापनाची मोहीम राबविण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने कृषी आयुक्तांना पाठवला आहे. संबंधित यंत्रणांना उपाययोजना करण्याबाबत कळविण्याचे त्यात म्हटले आहे.

विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग व तालुकास्तरीय गुलाबी बोंड अळी सनियंत्रण समितीच्या शास्त्रज्ञांनी अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत अनुक्रमे उमरी, गंगानगर, सातेफळ, चिकणी, आसा, आंबेटाकळी, बोरी अडगाव, किन्ही अादी ठिकाणी सर्वेक्षण केले. अाॅक्टोबरच्या शेवटच्या अाठवड्यात  घेतलेल्य या सर्वेक्षणात हिरव्या बोंडामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांवर अाढळून अाला.  प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशी, हलक्या ते मध्यम जमिनीतील ताण पडलेल्या कपाशीच्या तुलनेत संरक्षित अोलिताच्या कपाशीत व भारी जमिनीमधील हिरव्या कपाशीमध्ये जास्त अाढळून अाल्याचे अहवालात म्हटले अाहे.

अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान २९ ते ३२ अंश व रात्रीचे ११ ते १४.५ अंश सेल्सिअस, तर दिवसाची अार्द्रता ७१ ते ८० टक्के अाणि रात्रीची अार्द्रता २६ ते ३५ टक्के ही अत्यंत पोषक अाहे. या वर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या अाठवड्यापासून ते अाॅक्टोबरच्या तिसऱ्या अाठवड्यापर्यंत सरासरी दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सिअस असल्याने या अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतु अाता यापुढे तापमान जसजसे कमी होत जाईल व तापमानावरील श्रेणीमध्ये येईल, तसा हिरव्या बोंडमधील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढेल, असा इशाराही दिला अाहे.

शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिकाची स्थिती, पाण्याचा ताण व लागवडीचा कालावधी लक्षात घेऊन फवारणीचा निर्णय घेण्याची सूचनाही करण्यात अाली अाहे. संरक्षित अोलिताची सोय असलेल्या ठिकाणी हलके पाणी देऊनच फवारणी करावी. उमललेल्या बोंडातील कापूस वेचून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, अशी सूचनाही करण्यात अाली अाहे.

...अशा करा उपाययोजना

जेथे प्रादुर्भाव १० टक्क्यांवर अाहे, अशा ठिकाणी मिश्र कीटकनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यात क्लोरॲंट्रानिलिप्रोल (९.३ टक्के) + लॅंबडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के) पाच मिलि किंवा इंडोक्झकार्ब (१४.५ टक्के) + ॲसिटामिप्रिड (७.७ टक्के) १० मिलि किंवा क्लोरपायरिफॉस (५० टक्के)  + सायपरमेथ्रीन (५ टक्के) २० मिलि अशी फवारणी करावी.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...