agriculture news in marathi, bond larvae control campaign under RAW | Agrowon

`रावे`अंतर्गत बोंड अळी नियंत्रण मोहीम
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक तसेच संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे)च्या २ हजार २८० विद्यार्थ्यांच्या मदतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १९८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या काळात या जनजागृती मोहिमेची व्याप्ती ५०० गावांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत घटक तसेच संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे)च्या २ हजार २८० विद्यार्थ्यांच्या मदतीने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १९८ गावांमध्ये गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या काळात या जनजागृती मोहिमेची व्याप्ती ५०० गावांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

यंदापासून क्रॉपसॅपचे काम कृषी सहायक करत आहेत. परंतु रिक्त पदांमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी सहायकांनी कीड, रोग सर्वेक्षणासाठी ग्रामीण कृषी कार्यानुभवच्या (रावे) विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेले आहेत.

यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गंत घटक आणि संलग्न मिळून एकूण २७ कृषी महाविद्यालयातील २ हजार २८० विद्यार्थ्यांचा रावे उपक्रमात सहभाग आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये जाऊन कृषिदूत आणि कृषिकन्या शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत आहेत. यंदा कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्‍या संकल्‍पनेतून रावे अंतर्गत शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विलास पाटील, रावेचे समन्‍वयक डॉ. राकेश आहिरे, कीटकशास्‍त्र विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांच्‍या मार्गदर्शनाखाली बोंड अळी व्यवस्थापन विशेष मोहीम राबविण्‍यात येत आहे.

बोंड अळीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी शेतकऱ्यांच्‍या शेतावर विद्यार्थ्‍यांनी कामगंध सापळे लावले आहेत. कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक, मित्रकिडींची ओळख आणि महत्त्व, कीडकनाशक फवारणीचे वेळापत्रकांचे वाटप, कीडकनाशकांच्या सुरक्षित वापराचे प्रात्यक्षिक आदी माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित गावांतील कृषी सहायक, महाविद्यालयाचे प्राचार्य, रावेच समन्वयक यांच्‍या सहकार्याने ही मोहीम राबविण्‍यात येत आहे.

इतर बातम्या
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
खानदेेशातील शेतकऱ्यांना कांद्याच्या...जळगाव : मागील २० ते २२ दिवसांपासून कांद्याचे दर...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
सिन्नर तालुक्यातील खरीप पावसाअभावी...सिन्नर, जि. नाशिक : पावसाळा सपंत आला तरी...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
फळबागेसाठी दर्जेदार रोपांची निवड...औरंगाबाद : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातील...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
भीमा कारखान्याकडून थकीत ‘एफआरपी' जमा मोहोळ, जि. सोलापूर : टाकळी सिकंदर येथील भीमा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरीकोल्हापूर ः कोल्हापूर शहरासह परिसराला शुक्रवारी...
प्रलंबित कृषिपंपांच्या वीजजोडणीचा मार्ग...सोलापूर  : मार्च २०१८ अखेर प्रलंबित असलेल्या...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
सांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडेसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...