‘बोंड अळी‘साठी ‘मास ट्रॅपिंग, आयपीएम’ आवश्यक

‘बोंड अळी‘साठी ‘मास ट्रॅपिंग, आयपीएम’ आवश्यक
‘बोंड अळी‘साठी ‘मास ट्रॅपिंग, आयपीएम’ आवश्यक

नांदेडः कपाशीवर जुलै महिन्यात आढळून आलेला प्रादुर्भाव कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपयोजना तसेच जनजागृती मोहिमांमुळे कमी झाला आहे. परंतु येत्या काळात बोंड अळी आटोक्यात ठेवण्यासाठी मास ट्रॅपिंग आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) करणे आवश्यक आहे, असा सूर कृषिशास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) बोंडअळी नियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये व्यक्त केला.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बोंडअळी नियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ, जिल्हा समन्वयक क्रॉपसॅप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, एमएआयडीसी प्रतिनिधी, जिनिंग मिल्सचे प्रमुख, बियाणे व कीटकनाशके उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, कापूस उत्पादक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावेळी सध्याच्या पीकपरिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com