agriculture news in marathi, The bond yielded the subsidy and the return of insurance | Agrowon

बोंड अळीचे अनुदान अन्‌ विम्याचा परतावा रखडला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

नेकनूर, जि. बीड : यंदा दुष्काळ पडला असताना गतवर्षीच्या बोंड अळीचे अजून अनुदान मिळाले नाही. शिवाय भरलेल्या विम्याचा परतावाही आमच्या पदरी पडला नसल्याची व्यथा नेकनूर येथील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ६) जिल्हा प्रशासन दरबारी मांडली आहे.

नेकनूर येथील शेतकऱ्यांना बोंड अळी अनुदान व पीकविमा अनुदान वाटप झालेले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा व स्टेट बॅंक शाखेने अजूनही बोंड अळी व विमा परताव्याचे शेतकऱ्यांना वाटप केले नाही. कोणतेही अनुदान हे वेळेत वाटप होत नाही. एकतर दुष्काळ पडल्याने शेतकरी अडचणीत आहे आणि त्यातही शासनाकडून येणारी तुटपुंजी मदत वेळेवर मिळत नाही.

मागील पाच महिन्यांपासून शेतकरी तलाठी कार्यालय, बॅंक व तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत; परंतु आजपर्यंत अनुदान वाटप झाले नाही. संबंधित अधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. वरिष्ठांकडे तक्रार केल्याशिवाय कोणत्याही अनुदानाचे वाटप होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वंचित व त्रस्त शेतकऱ्यांनी निवासी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

इतर बातम्या
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...