agriculture news in Marathi, bonsai council in pune from 22 february, Maharashtra | Agrowon

पुण्यात २२पासून आंतरराष्ट्रीय बोन्साय परिषद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे : भारतामध्ये बोन्साय निर्मिती व कलेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये ‘बोन्साय नमस्ते’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये त्यांच्या एक हजाराहून अधिक बोन्साय कलाकृती मांडण्यात येणार आहे. 

पुणे : भारतामध्ये बोन्साय निर्मिती व कलेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये ‘बोन्साय नमस्ते’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये त्यांच्या एक हजाराहून अधिक बोन्साय कलाकृती मांडण्यात येणार आहे. 

पुणे येथील १९८६ पासून बोन्साय कला शिकत असलेल्या प्राजक्ता गिरीधर काळे यांनी सुचेता अवदानी, कामिनी जोहारी, राहुल राठी आणि मार्क डिक्रुज या समविचारी मित्र मैत्रिणींबरोबर ‘बोन्साय नमस्ते’ ही संस्था सुरू केली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून बोन्सायला ओळख प्रदान करण्याचा ध्यास घेतला आहे.
‘बोन्साय नमस्ते’ या उपक्रमाबद्दल माहिती देताना प्राजक्ता काळे यांनी सांगितले, की बोन्साय निर्मितीचे मूळ भारतात असून, बौद्ध धर्माच्या प्रसारासोबत ‘वामनवृक्ष कला’ परदेशामध्ये गेली. पुढे त्याला जपानने कलेचे स्वरूप दिले. भारतात मात्र ही कला तुलनेने मागे पडत गेली. या कलेला व्यासपीठ देण्यासोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यातील संधी पोचवण्याच्या उद्देशाने ‘बोन्साय नमस्ते’ कार्यरत आहे. 

पिंपळाच्या पानाच्या आकारात एकूण दहा विभागांमध्ये एक हजाराहून अधिक बोन्साय कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यात येईल. त्यात मामे, शोहीन, स्मॉल बोन्साय, मीडियम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय यांचा समावेश असेल. येथे १ मीटर उंचीच्या सर्वांत जुन्या १५० वर्षांचे उंबराच्या बोन्सायपासून ३ इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय लोकांना पाहता येईल. प्रदर्शन स्थळी बोन्सायविषयक पुस्तकांचे एक ग्रंथालयही असेल. या वेळी संस्थेचे सल्लागार जनार्दन जाधव यांच्यासह गिरीधर काळे हे देखील उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय परिषद 

  • बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी १६ देशांतील बोन्साय मास्टर्स या परिषदेत सहभागी होणार आहेत. 
  • विविध कार्यशाळांमधून या मास्टर्सद्वारे भारतीय बोन्साय कलाकारांना प्रात्यक्षिके दाखवण्यात येतील. त्याचा फायदा बोन्साय कला शिकू पाहणाऱ्या कृषी व फलोत्पादन विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांना घेता येईल. त्यातून प्री बोन्साय मटेरियल निर्मितीसह विविध शेतीपूरक उद्योगांना चालना मिळू शकेल.

बोन्साय नमस्ते 

  • आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन
  • स्थल : कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, पुणे.  प्रदर्शन कालावधी ः २२ ते २५ फेब्रुवारी
  • वेळ : सकाळी ९ ते रात्री १०
  • प्रवेश : विनामूल्य 

इतर अॅग्रो विशेष
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...
आधी धान्य घ्या, पैसे ऊस बिलातून घेतो...कोल्हापूर : केवळ उसाचे उत्पादन घेतल्याने आलेल्या...
खरीप आढावा बैठका जिल्हाधिकारी घेणारपुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप...
कृषिसेवक भरतीला न्यायाधीकरणाची मनाईपुणे : कृषिसेवक पदासाठी झालेल्या परीक्षेच्या...
लिंबावर काळ्या माशीचा प्रादुर्भावअकोला: लिंबू बागांमध्ये सध्या आंबिया बहर...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी...बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या...
‘ग्रीन होम एक्स्पो’ला पुण्यात प्रारंभपुणे : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या वतीने सेकंड होम,...
रेपो रेटघटीचा लाभ कोणाला?केंद्रीय अर्थसंकल्प, रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक...
यांत्रिकीकरण ः वास्तव आणि विपर्याससध्या राज्यभर विविध योजनांमधून अवजारे अनुदान...