agriculture news in Marathi, bonsai international exhibition start in pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात ‘बोन्साय नमस्ते’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

पुणे ः विविध वृक्षांच्या बोन्साय निर्मितीमधून शेतकऱ्यांसह बाेन्साय संवर्धकांना राेजगार संधी निर्माण व्हाव्यात आणि या कलेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयाेजित ‘बोन्साय नमस्ते’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला गुरुवार (ता. २२) पासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनामध्ये एक हजाराहून अधिक आंतरराष्‍ट्रीय बोन्साय कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. 

पुणे ः विविध वृक्षांच्या बोन्साय निर्मितीमधून शेतकऱ्यांसह बाेन्साय संवर्धकांना राेजगार संधी निर्माण व्हाव्यात आणि या कलेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयाेजित ‘बोन्साय नमस्ते’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला गुरुवार (ता. २२) पासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनामध्ये एक हजाराहून अधिक आंतरराष्‍ट्रीय बोन्साय कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. 

पुण्यातील बोन्साय कला संवर्धक आणि प्रसारक प्राजक्ता काळे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या बाेन्साय नमस्ते या संस्थेने प्रदर्शन आणि परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार (ता. २५) पर्यंत खुले असणार आहे.  
प्रदर्शनाला सकाळी माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार पत्नी प्रतिभा यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. या वेळी प्राजक्ता काळे यांनी बाेन्साय कलाकृतींची माहिती श्री. पवार यांना दिली. बाेन्साय कलाकृती द्वारे शेतकऱ्यांना राेजगाराच्या माेठ्या संधी उपलब्ध हाेतील, असेही काळे यांनी पवार यांना सांगितले.
 
प्रदर्शनामध्ये पिंपळाच्या पानाच्या आकारात एकूण दहा विभागांमध्ये एक हजाराहून अधिक बोन्साय कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मामे, शोहीन, स्मॉल बोन्साय, मीडियम बोन्साय, लार्ज व एक्स्ट्रा लार्ज बोन्साय यांचा समावेश आहे. तसेच एक मीटर उंचीच्या सर्वांत जुन्या १५० वर्षांचे उंबराच्या बोन्सायपासून ३ इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय प्रदर्शनाचे आकर्षण ठरले आहे. तसेट बोन्सायविषयक पुस्तकांचे दालन देखील उभारण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय कलाकृती सादर 
प्रदर्शनामध्ये बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी १६ देशांतील बोन्साय मास्टर्सने बनविण्यात आलेली विविध बाेन्साय कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत.  

बोन्साय नमस्ते आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन
    स्थळ :
कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, पुणे
    प्रदर्शन कालावधी ः २२ ते २५ फेब्रुवारी
    वेळ : सकाळी ९ ते रात्री १०
    प्रवेश : विनामूल्य
 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...