agriculture news in marathi, Both congress to meet today for election planning | Agrowon

दोन्ही काँग्रेसची आज संयुक्त बैठक
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त बैठक आयोजित केली आहे. आज (ता.६) होणाऱ्या या बैठकीत सरकारच्या विरोधात मोट बांधण्याबरोबरच आगामी निवडणुका आघाडी करून लढण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. 

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर आता राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त बैठक आयोजित केली आहे. आज (ता.६) होणाऱ्या या बैठकीत सरकारच्या विरोधात मोट बांधण्याबरोबरच आगामी निवडणुका आघाडी करून लढण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. 

अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारच्या विरोधात एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. त्याच धर्तीवर राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासोबतच आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षानी मिळून नुकतीच संविधान बचाव रॅली काढली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार पुढची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल अशी शक्यता  आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...