agriculture news in marathi, The bottom has reached the well due to the absence of rain | Agrowon

पावसाअभावी विहिरींनी गाठला तळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची भीषण स्थिती निर्माण होऊ लागली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुरंदर, शिरूर, दौड, बारामती, इंदापूर तालुक्यांतील बहुतांशी विहिरींनी तळ गाठला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची भीषण स्थिती निर्माण होऊ लागली आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुरंदर, शिरूर, दौड, बारामती, इंदापूर तालुक्यांतील बहुतांशी विहिरींनी तळ गाठला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वेकडील दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यात मुळा, मुठा व भीमा नदीचे पात्र आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची समस्या लवकर जाणवत नाही. परंतु तालुक्याच्या शिरूर, पुरंदर, बारामती तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मध्यवर्ती भागात पाण्याची समस्या सुरू झाली आहे. मागील चार ते पाच वर्षांपूर्वी अशीच स्थिती या भागात होती. सधन भागातसुद्धा टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून द्यावे लागले होते. चालू वर्षीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

यंदा आॅक्टोबरमध्येच विहिरी तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. हिवाळा चार आणि उन्हाळ्याचे चार महिने कसे जातील याची चिंता सध्या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. शेती असूनही पाणी नसेल तर तिचा काय उपयोग असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. पावसाळ्याचे चार महिने कोरडे गेले आता, शेतीचे गणित कसे बसवावे, असा विचार शेतकऱ्यांचा सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्याच्या मध्यवर्ती भागात काही प्रमाणात पाण्याची स्थिती चांगली असली तरी आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे.

यंदा कमी झालेल्या पावसामुळे विहिरींचे पाणी खूप खाेल गेले आहे. सध्या विहिरींनी चांगलाच तळ गाठण्यास सुरवात केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचीही अडचण होणार असल्याची स्थिती तयार झाली आहे.
- सुनील राजेभोसले, शेतकरी, जोगवडी, ता. बारामती

पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असून, भूजल पातळीही चांगलीच खालवली आहे. त्यामुळे अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची स्थिती तयार झाली आहे. उन्हाळ्यात यापेक्षा भयंकर स्थिती तयार होण्याची चिन्हे आहेत.
- भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, करडे, ता. शिरूर

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...