पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरच राज्य कारभार सुरू आहे.
ताज्या घडामोडी
नाशिक : ओखी वादळाने पीडित शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईचा निधी सरकारकडून नुकताच मिळाला असला तरी बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी मात्र अजूनही प्रतीक्षेत आहेत. नाशिक विभागात बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार २६५ असून, राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतील तरतुदींनुसार त्यांना ७५२ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपये इतक्या निधीची गरज आहे.

विभागातील नाशिकसह खानदेशातील चारही जिल्ह्यांमध्ये कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. कापूस पिकाखालील एकूण ८ लाख ९५ हजार ५२९ हेक्टरपैकी तब्बल ७ लाख ९३ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावरील पीक बोंड अळीने फस्त केले. यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार विभागातील पीडित ८ लाख ६१ हजार २६५ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त कापूस पिकाचा पंचनामा केला होता. मात्र, या शेतऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. विभागातील जळगाव जिल्ह्यात बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे.
शासनाने मागविला अहवाल
बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादकांच्या नुकसानभरपाईची रक्कम सरकारने नुकतीच निश्चित केली. त्यासंदर्भातले आदेश कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले. या शेतकऱ्यांना ''एनडीआरएफ''मधील तरतुदींनुसार शासनाने जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ६८०० रुपये तर बागायती क्षेत्रासाठी १३५०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे नुकसानभरपाई जाहीर केली. ही मदत अधिकाधिक दोन हेक्टर क्षेत्रासाठी लागू होणार आहे.
''एनडीआरएफ''च्या तरतुदींनुसार आतापर्यंत पिकाच्या नुकसानाची अट ५० टक्के इतकी होती. मात्र, शासनाच्या ताज्या अध्यादेशानुसार ही अट शिथिल केली असून, आता ३३ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळणार आहे. याशिवाय पीकविमा योजना आणि कॉटन ॲक्ट जीएसाआयमधील तरतुदींनुसार मदत मिळणार आहे. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या निधीची मागणी करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
- 1 of 349
- ››