agriculture news in Marathi, bowl worm control within 1 year in state, Maharashtra | Agrowon

बोंड अळी वर्षातच नियंत्रणात; कृषी विभागाचा होणार गौरव !
सुर्यकांत नेटके
शुक्रवार, 15 मार्च 2019

राज्यात कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापूस उत्पादन अडचणीत होते. कोलमडलेल्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी बोंड अळीचा प्रादुर्भाव थांबविण्याचे मोठे अाव्हान कृषी विभागासमोर होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीने कृषी विभागाने केलेले काम आणि जनजागृतीचा परिणाम म्हणून गुलाबी बोंड अळीचे निर्मूलन करण्यात यश आले. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली असून, केंद्राचे अधिकारी कापूस उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत.
- पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

नगर ः देशातील अन्य राज्यांत बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी गेला. मात्र महाराष्ट्रात वर्षभरातच बोंड अळी नियंत्रणात आणण्याला कृषी विभागाला यश आले. देशात सर्वांत कमी कालावधीत बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखल्यामुळे केंद्र राज्याचा गौरव करणार आहे. त्यासाठी सोमवारपासून केंद्राचे दोन सदस्यीय पथक राज्यात आले आहे.

पाच दिवस ते राज्यातील विविध भागात जाऊन कापूस उत्पादकांशी संवाद साधत ‘‘बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती घेत असून त्यांच्या अहवालानुसार राज्याच्या कृषी विभागाचा केंद्र सरकार गौरव करणार आहे. 

देशाभरात सुमारे १ कोटी २२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाते. त्यात सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. त्यापाठोपाठ गुजरातेत २४ लाख, तेलंगणात १९ लाख, मध्यप्रदेशात ८ लाख व कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणात मिळून जवळपास २० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. 

देशभरात कापसाचे पीक गेल्या पाच वर्षांत सातत्याने अडचणीत येत आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर तर मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक वाया गेले. त्याचा मोठा आर्थिक फटका उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे बोंड अळीचे संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाला मोठी कसरत करावी लागली.

बोंड अळीमुळे कापसाच्या उत्पादनात ८० टक्के घट झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी (२०१७-१८) राज्यात ९०० कोटी रुपयांची तर नगर जिल्ह्यामध्ये १५७ कोटी रुपयांची मदत द्यावी लागली होती. त्यामुळे बोंड अळीचे संकट हटविण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. प्रत्येक कृषी सहायकाच्या माध्यमातून प्रत्येक गावांत सभा घेतल्या, पत्रके वाटली. त्याचा परिणाम म्हणून बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव एक वर्षात रोखण्यात राज्यात यश आले. त्याचा परिणाम म्हणून यंदा राज्यात कोठेही गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. 

गेल्या पाच वर्षांपासून देशात बोंड अळीचे संकट आहे. अन्य राज्यांत बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्याठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागला होता. कृषी विभागाने केलेल्या गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कामाची केंद्र सरकारने दखल घेतली असून राज्यात केलेल्या विविध बाबींचा तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या दोन शास्त्रज्ञानाचे पथक सोमवारपासून राज्यात आले आहे.

नगरसह जळगाव, औरंगाबाद व अन्य कापसाचे क्षेत्र जास्ती असलेल्या भागात पाहणी करणार आहे. या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील कृषी विभागाचेही अधिकारी आहेत. शेतकरी, जिनिंग प्रेसिंग वाल्याशी ते संपर्क साधणार आहेत. गुलाबी बोंड अळी निर्मूलनात राज्याने केलेल्या प्रभावी कामाचा केंद्र सरकार राज्याच्या कृषी विभागाचा गौरव करणार असल्याचे सांगण्यात आले. 

इतर अॅग्रो विशेष
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...