agriculture news in Marathi, bowl worm on mahabeej BT, Maharashtra | Agrowon

‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरले
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

या वर्षी काही कारणांमुळे बीटी बियाणे उत्पादन शक्‍य झाले नाही. त्यामुळे येत्या हंगामाऐवजी पुढील वर्षीच्या हंगामात महाबीज बीटी-२ कपाशी वाणांचा पुरवठा करणार आहे. बियाणे बाजार नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल.
- ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला

नागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे बीटी वाण येत्या हंगामात येण्याची शक्‍यता मावळली आहे. एन.एच.-४४ या अकोला कृषी विद्यापीठ, तसेच ‘महाबीज’द्वारे स्वतः विकसित वाणात बीटी जीनचा अंतर्भाव केला जाणार होता. परंतु बिजोत्पादन क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येते.

बियाणे बाजारपेठ नियंत्रित राहावी याकरिता महाबीजचा प्रयत्न राहतो. त्यानुसार या वर्षीच्या हंगामात बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले कापूस बियाणे बाजारात आणण्याचे प्रस्तावित होते. त्याकरिता बीजोत्पादन कार्यक्रमही राबविल्याचे सांगितले जाते. परंतु राज्यात या वर्षी कापसावर मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला.  त्याचा फटका महाबीजच्या बिजोत्पादन कार्यक्रमालाही बसल्याचे सांगितले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीद्वारे विकसित एन.एच-४४, अकोला कृषी विद्यापीठ तसेच महाबीजच्या स्वविकसित वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जाणार होता. मात्र बोंडअळीने बिजोत्पादनाला फटका बसल्याने यावर्षी महाबीजचे कपाशी वाण बाजारात येणार किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्‍त होत आहे. 

यापूर्वीदेखील खासगी बियाणे कंपनीच्या सहकार्याने तर काही वर्षांपूर्वी महाबीजने स्वतः कपाशी बीटी बियाणे बाजारात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे दोन्ही प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. यावर्षी विद्यापीठांच्या सहकार्याने बीटी बियाण्यांचा पुरवठा करण्यात महाबीजला यश येईल, अशी अपेक्षा असताना हा प्रयत्नदेखील फसल्यामुळे चर्चांना ऊत आला आहे. 

प्रायोगिक तत्त्वावर पुरवठा
महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेली कपाशी पाकीट प्रायोगिक तत्त्वावर पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. पाकिटांची संख्या जेमतेम राहील; ती किती राहील हे अद्याप स्पष्ट नाही. बोंड अळीमुळे ही परिस्थिती उद्‍भवली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...