ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन सहा टक्क्यांनी घटणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली ः ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन यंदा (२०१७-१८) सहा टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.
 
ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादन घेणारा देश अाहे. गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये ११४ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. यंदा सोयाबीन उत्पादन १०७ दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता अाहे.
 
येथील ३४.७ दशलक्ष हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक क्षेत्र काही प्रमाणात अधिक अाहे. मात्र उत्पादन घटणार असल्याचे संकेत ‘यूएसडीए’ने अहवालातून दिले अाहेत.
 
सप्टेंबरच्या अखेरपासून येथे सोयाबीन पेरणी सुरू झाली अाहे. चांगल्या पावसामुळे येथील पश्चिम अाणि दक्षिण भागात पेरणी वेगाने सुरू अाहे. यंदा येथून ६४ दशलक्ष टन सोयाबीन निर्यात होण्याची शक्यता अाहे.
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.५ टक्क्यांनी कमी सोयाबीन निर्यात होणार अाहे. चीन हा ब्राझीलमधील सोयाबीनचा मोठा खरेदीदार अाहे. ब्राझीलमध्ये सोयामिलला देशांतर्गत मागणी अधिक अाहे. त्यात उत्पादन घटणार असल्याने निर्यात कमी होणार अाहे. तसेच सोयातेलाची निर्यात कमी होणार असल्याचे यूएसडीएने म्हटले अाहे. 
ब्राझीलमधील (२०१७-१८) सोयाबीन
उत्पादन अंदाज
  • पीकक्षेत्र.......३४.७ दशलक्ष हेक्टर
  • उत्पादन.......१०७ दशलक्ष टन
  • निर्यात.........६४ दशलक्ष टन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com