विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच ब्राझीलचे नवे मोसंबी वाण

विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच ब्राझीलचे नवे मोसंबी वाण
विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच ब्राझीलचे नवे मोसंबी वाण

नागपूर : ज्यूस उद्योग तसेच प्रक्रियेकामी उपयोगी पडणाऱ्या आणि ब्राझीलवरून आणलेले मोसंबीचे वाण हॅमलीन व पेरा हे विदर्भातील वातावरणात पोषक ठरत आहेत. आणखी काही वर्षे निरीक्षणाअंती या वाणाच्या या भागातील प्रसारणास मान्यता देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांनी दिली.

संस्थेच्या परिसरात गुरुवारी (ता. १४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदेशातून हॅमलीन, पेरा, नाताल, व्हॅलेंशिया, वेस्टीन ही पाच वाण आणण्यात आली होती. संस्थेच्या प्रक्षेत्रावर त्याची लागवड करण्यात येत. येथील भौगोलिक वातावरणात तग धरणाऱ्या वातावरणासंदर्भाने निरीक्षण नोंदविण्यात आले. जैन इरिगेशनकडून कोकाकोलासोबत संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जात आहे. त्याकरितादेखील हॅमलीन व पेरा या वाणांच्या रोपांचा वापर झाला आहे.

जळगाव भागातील वातावरणातदेखील हे वाण तग धरणारे असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. हॅमलीन व पेरा वाण लवकर येणारे असून, ते ऑक्‍टोबरमध्ये परिपक्‍व होईल. याच्या फळ काढणीस थोडा जरी उशीर झाला तर फळांची गुणवत्ता घसरते. नाताल या वाणात ३५ ते ४० फळ तिसऱ्याच वर्षी मिळण्यास सुरवात झाली. यातील काही फळांचे पृथ्थकरण करण्यात आले. या वाणांमध्ये रसाचे प्रमाण ४० ते ४५ आहे. पंजाबमधून मोसंबीचे ब्लडरेड, पायनापल, जाफा अशी तीन वाण आणत त्यावरदेखील आपल्या वातावरणातील बदलांसंदर्भाने निरीक्षण नोंदविले जात आहेत. ब्लडरेड हे वाण विदर्भातील वातावरणात तग धरत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले, असेही डॉ. लदानिया यांनी सांगितले. या संपूर्ण विदेशी फळवाणांची उंच वरंब्यावर लागवड करण्यात आली असून, ठिबक सिंचन पद्धतीने खत व पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लिंबूत नव्या वाणांची सघन लागवड लेमन (लिंबू) ग्रुपमधील काही वाण निवड पद्धतीने प्रायोगिक तत्त्वावर प्रक्षेत्रावर लावण्यात आली आहेत. आसाम लेमन, कागजीकलान, पंतलेमन, बारामासी लेमन या वाणांचा त्यात समावेश आहे. यातील पंत लेमन व आसाम लेमन यांचे उत्पादन चांगले मिळाले आहे. बारामासी या वाणात सहा महिन्यांतच फुलधारणा होण्यास सुरवात झाली. दीड वर्षातच ८० फळे पण आली आहेत. ४ बाय ३ मीटर याप्रमाणे प्रतिहेक्‍टरी ८३३ झाडे बसतील. याप्रमाणे सघन लागवड केल्यास यातून आर्थिक उत्कर्ष साधता येणार आहे. १२० ते १६० ग्रॅम एका फळाचे वजन आहे.

शेतकऱ्यांकडे वाणांचा पर्याय आणि बहुविध पिकांचे पर्याय असणे गरजेचे आहे. एकाच वेळी कीडरोग आले किंवा एखाद्या शेतमालाचे भाव कोसळल्यास नुकसान होते. त्यामुळे बहुविध पीक आणि वाण पर्याय असावा याकरिता आमचा प्रयत्न आहे. - डॉ. मिलिंद लदानिया , संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com