यसनी तोडून पुढे या : रमेश घोलप

यसनी तोडून पुढे या : रमेश घोलप
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलप

सोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत तोडत मी पुढे आलो. ‘यसन' ही कादंबरी आणि त्या लेखकाचा प्रवास उसाच्या फडात जन्मणाऱ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण करेल. पुस्तक खूप ताकदीने लिहिले असून इतरांना लिहिण्यास भाग पाडेल,''  असे मत झारखंडचे कृषी आयुक्त रमेश घोलप यांनी व्यक्त केले. 

ज्ञानेश्‍वर जाधवर लिखित 'यसन' या कादंबरीचे प्रकाशन बोरगाव (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या उसाच्या फडात सोमवारी (ता. २०) सकाळी करण्यात आले. प्रा. डॉ. भारती रेवडकर, डॉ. अशोक कदम, प्रा. विशाल गरड, अभिनेता विठ्ठल काळे, बोरगावच्या सरपंच रेखा जाधवर, आरजे ग्रुपचे राहुल जाधवर आदी उपस्थित होते. 

गरड म्हणाले, "कादंबरी वाचत असताना डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक माणसाने त्यांच्या आयुष्यातील यसन तोडणे गरजेचे असले, तरी ज्याच्या हाती कासरा असतो तो त्याला दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे यसन हाती घेण्याचा संदेश या कादंबरीतून मिळतो.''

जाधवर म्हणाले, ''कादंबरी ऊसतोड कामगार व त्यांच्या जीवनाविषयी आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उसाच्या फडात घेतला. ही अडवळणाची वाट असली, तरी त्यांच्यापर्यंत कादंबरी आणि साहित्य पोचावे हा या मागचा प्रयत्न आहे.''   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com