agriculture news in Marathi, bridge come barrages on national highway in Latur District, Maharashtra | Agrowon

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर होणार ‘ब्रिज कम बॅरेजेस’
हरी तुगावकर
मंगळवार, 2 जानेवारी 2018

लातूर जिल्ह्यात नवीन धरण उभारणे अवघड आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून, हे महामार्ग १८ ठिकाणी नदीवरून जात आहेत. त्या ठिकाणी ब्रिज कम बॅरेजेसची संकल्पना मांडण्यात आली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यावर ६२४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देशातील हा पहिला प्रकल्प असेल. याचा सिंचनाला मोठा फायदा होईल.
- संभाजी पाटील निलंगेकर, कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री, लातूर.
 

केंद्र शासनाच्या वतीने सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. लातूर जिल्ह्यातूनही राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. या महामार्गावर असलेल्या नद्यांच्या ठिकाणी `ब्रिज कम बॅरेजेस` असा देशातील पहिला प्रकल्प लातूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याकरिता केंद्रशासन ६२४ कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्याचे कामगार कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात सहा हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शेतीच्या पाण्यासाठी, सिंचनाची सोय करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली होती. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील महापालिकेच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्याला टंचाई भासणार नाही याची काळजी घेऊ अशी ग्वाही दिली होती; पण जिल्ह्यात नवीन धरण बांधणे शक्य नाही, त्यासाठी साइटही उपलब्ध नाही. त्यात दर पावसाळ्यात शंभर टीएमसीपेक्षा जास्त पाणी वाहून जात आहे. हे श्री. निलंगेकर यांच्या लक्षात आले. हे पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.

जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जात असून, हे महामार्ग १८ ठिकाणी मांजरा व तेरणा नदीवरून जात आहेत. हे त्यांच्या लक्षात आले.  या ठिकाणी नदीवर `ब्रिज कम बॅरेजेस` बांधता येऊ शकतात का, ही संकल्पना पालकमंत्री निलंगेकर यांना सुचली. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हे फिजिबल होऊ शकते का, याच्या सूचना देऊन सर्व माहिती एकत्रित करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. हा प्रस्ताव घेऊन निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर केला.

देशातील या पहिल्या प्रकल्पाची संकल्पनाही त्यांना सांगितली. मंत्री गडकरी यांनाही ती आवडली. त्यांनी या प्रस्तावाला तातडीने तत्त्वतः मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी दिल्लीत खासदार व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत लातूरसारखा अशा पद्धतीचा प्रयोग देशभरात राबविला जावा याकरिता प्रयत्न करावेत, अशा सूचनाही दिल्या आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अठरा ठिकाणी `ब्रिज कम बॅरेजेस` उभारण्याचा हा प्रकल्प आहे. याकरिता केंद्रशासन ६२४ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात पाणी थांबून त्याचा जिल्ह्यातील सिंचनासाठी मोठा उपयोग होणार आहे. देशातील अशा पद्धतीचा हा पहिला प्रकल्प असणार आहे. यातून जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. 

लातूर जिल्ह्यातील सिंचनाची स्थिती

एकूण क्षेत्र    ७ लाख १५ हजार हेक्टर
लागवडीलायक क्षेत्र    सहा लाख ५२ हजार हेक्टर
सध्या सिंचन होत असलेले क्षेत्र   एक लाख १६ हजार हेक्टर
सध्याचा एकूण पाणीसाठा  ९६२ दशलक्ष घनमीटर
ब्रिज कम बॅरेजेसमुळे निर्माण होणारा पाणीसाठा ३६ दशलक्ष घनमीटर (अंदाजे)
ब्रिज कम बॅरेजेसमुळे निर्माण 
होणारे सिंचन
सहा हजार हेक्टर (अंदाजे)

 
   
    
    
 

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...