गडचिरोलीत श्रमदानातून बांधला नाल्यावरचा पूल
विनोद इंगोले
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

गडचिरोली : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा आणि कल्पकतेचा प्रत्यय देत दुर्गम आणि नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांबूचा पूल तयार केला. गुंडेनूर नाल्यावर तयार करण्यात आलेल्या १५० फूट लांब आणि ६ फूट रुंद या पुलामुळे गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क होण्यास मदत झाली आहे.

गडचिरोली जिल्हा हा बारमाही नद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परिणामी पावसाळ्यात या भागातील नद्या, नाल्यांना पूर येत गावांचा संपर्क शहर मुख्यालयाशी तुटतो. नक्षल्यांकडून विरोध असल्याच्या परिणामी अनेक दुर्गम भागांत रस्ते, नद्यांवरील पुलांचे कामही होऊ शकले नाही.

गडचिरोली : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा आणि कल्पकतेचा प्रत्यय देत दुर्गम आणि नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांबूचा पूल तयार केला. गुंडेनूर नाल्यावर तयार करण्यात आलेल्या १५० फूट लांब आणि ६ फूट रुंद या पुलामुळे गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क होण्यास मदत झाली आहे.

गडचिरोली जिल्हा हा बारमाही नद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परिणामी पावसाळ्यात या भागातील नद्या, नाल्यांना पूर येत गावांचा संपर्क शहर मुख्यालयाशी तुटतो. नक्षल्यांकडून विरोध असल्याच्या परिणामी अनेक दुर्गम भागांत रस्ते, नद्यांवरील पुलांचे कामही होऊ शकले नाही.

विशेष म्हणजे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्‍याचे चित्रही यापेक्षा वेगळे नाही. या आदिवासी बहुल तालुक्‍यात चांगले रस्ते नाहीत, एवढेच नाही तर नद्यांवर पूलदेखील नाहीत. त्यामुळे नदीपलीकडे राहणाऱ्या गावकऱ्यांना होडी, डोग्यांच्या आधारे नदी पार करावी लागते.

या अवस्थेत वर्षानुवर्षे जीवन जगणाऱ्या ग्रामस्थांच्या समस्या प्रशासनाने सोडविल्या नाहीत. अखेर इच्छाशक्‍तीच्या बळावर ग्रामस्थांनीच या समस्यांवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. लाहेरीपासून ५ किलोमीटर अंतरावरील गुंडेनूर गावाजवळून गुंडेनूर नाला वाहतो. या नाल्याचे पात्र खोल व मोठे असल्याने पावसाळाभर व नंतरही तो वाहत असतो.

यामुळे भामगराड, लाहेरी, बिनागुंडा, कुवाकोडी, तुरमर्का, फादेवाडा, पेरमिलभट्टी आदी गावांचा संपर्क तुटतो. बाजारहाट करण्यापासून तर गावातील मुलांचे शिक्षण यामुळे प्रभावित होते. शासकीय कामेदेखील वेळेवर होत नाहीत.

कल्पकतेतून तयार केला पूल

ग्रामस्थांनी शासनावर अवलंबून न राहता कल्पकतेतून पूल उभारण्याचा निर्णय घेतला. १५० फूट लांब आणि सहा फूट रुंदीचा पूल तयार केला. बांबू, लाकूड आणि दगड या स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या संसाधनाचा वापर याकामी केला गेला असून, अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना या माध्यमातून साकारला गेला आहे.

इतर अॅग्रो विशेष
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...