agriculture news in marathi, bridge cum bund will build in vidarbha, nagpur, maharashtra | Agrowon

विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम बंधारे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने स्वयंचलित दरवाजे असलेल्या ब्रिज कम बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने त्याकरिता पुढाकार घेतला असून, पाच ठिकाणी असे बंधारे उभारण्यात येतील.

वर्धा जिल्ह्यातील सारवाडी (ता. कारंजा घाडगे) येथे पाच कोटी रुपये खर्चून अशा प्रकारचा पहिला बंधारा लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ब्रिज तिथे बंधारा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने स्वयंचलित दरवाजे असलेल्या ब्रिज कम बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने त्याकरिता पुढाकार घेतला असून, पाच ठिकाणी असे बंधारे उभारण्यात येतील.

वर्धा जिल्ह्यातील सारवाडी (ता. कारंजा घाडगे) येथे पाच कोटी रुपये खर्चून अशा प्रकारचा पहिला बंधारा लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ब्रिज तिथे बंधारा ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

अमरावती ते नागपूर मार्गावर जाम नदीवरील वर्धा जिल्ह्यातील सारवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या बंधाऱ्याच्या कामाकरिता पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून पाच बंधारे बांधले जातील. विदर्भातील तिवसा, देवळी, जामणी, अडदाफाटा, समुद्रपूर या भागात असे एकूण पाच बंधारे बांधले जातील. त्यावर सुमारे २५ कोटी रुपये खर्च होणार आहे. देशात पहिल्यांदाच ब्रिज कम बंधाऱ्यांची संकल्पना विदर्भात राबविली जात आहे. 
 

दरवाजांची यंत्रणा स्वयंचलित
जलसंधारणाच्या पारंपरिक पद्धतीत दरवाजे स्वयंचलित नसल्याने वापराविना खराब होतात किंवा ते हाताळण्यात अडचणीत येतात. मात्र या ब्रिज कम बंधाऱ्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दरवाजे हे स्वयंचलित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नदीला आलेल्या पहिल्या दोन पुरामुळे वाहून आलेला गाळ व कचरा निघून जाईल. त्यानंतर त्यामध्ये जलसाठा निर्माण होणार आहे. हा बंधारा बांधताना बंधाऱ्याच्या मागील ५०० मीटर परिसरापर्यंत नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंदाजे ५०० एकर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय होईल.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...